Pakistan Cricket Board : टी20 वर्ल्ड कपमधल्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड  (Pakistan Cricket Board) अॅक्शन मोडवर आला आहे. पाकिस्तानात बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 21 ऑगस्टपासून होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामेागे पाकिस्तानात पाच महिन्यांपूर्वी घडलेली एक घटना जबाबदार आहे. या निर्णयामुळे अवघ्या 15 रुपयात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) फलंदाजी पाहाता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 रुपयात बाबर आझमची फलंदाजी
अवघ्या पंधरा रुपयात बाबरची पळंदाजी पाहाता येणार हे कसं शक्य आहे, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला असेल तर हे खरं आहे. पाकिस्तान क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आता हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. केवळ 15 रुपयात तुम्हाला सामना पाहाता येणार आहे. पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेसाठी तिकिटांची रक्कमच कमी करण्यात आली आहे. 


पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिका
पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेला प्रेक्षकांची गर्दी व्हावी या उद्देशाने पीसीबीने या मालिकेसाठी अवघ्या 50 रुपयांचं तिकिट ठेवलं आहे. भारतीय रुपायत ही रक्कम केवळ 15 रुपये इतकी होते. स्टेडिअममधल्या मोक्याच्या जागेनुसार हे दर बदलणार आहेत. जे क्रिकेट चाहते सामन्याचा प्रीमिअम अनुभव घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी तिकिटाचे सर्वोच्च दर अडीच लाख रुपये इतके असणार आहे. कराचीतल्या नॅशनल क्रिकेट स्टेडिअममधल्या सामन्यासाठी हे दर निश्चित करण्यात आले आहेत. 


रावळपिंडीत तिकिटांचा दर वाढणार
पाकिस्तान आणि बांगलादेशदरम्यानचा दुसरा कसोटी सामना रावळपिंडीत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी सर्वात स्वस्त तिकिट 200 रुपये इतकं असणार आहे. भारतीय रुपयात याची किंमत 60 रुपये इतकी होते. या स्टेडिअमधल्य गॅलरीच्या तिकिटची किंमत 2800 रुपये पाकिस्तान रुपये असणार आहे. यात चहा आणि लंचची सुविधा मिळणार आहे. प्लॅटिनम बॉक्सच्या तिकिटाची रक्कम 12500 रुपये इतकी आहे. तर सर्वात महागडं तिकिट 2 लाख रुपये इतकं आहे. 


5 महिन्यांपूर्वी झाला होता अपमान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिकिटांच्या रकमेत इतकी घट का केली असा सावल उपस्थित केला जात आहे. तर निर्णयाचा संबंध पाच वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेशी जोडला जातोय. वास्तविक मार्च 2024 मध्ये खेळवण्यता आलेल्या पाकिस्तान क्रिकेट लीगच्या एलिमिनेटर आणि फायनलकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. स्टेडिअम अक्षरश: रिकामे होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही सर्वात मोठी लीग असतानाही प्रेक्षकांची उपस्थित नसल्याने अपमान झाला होता. सामन्याची तिकिटं महाग असल्याचं प्रमुख कारण यामागे असल्याचं बोललं जातं. यातून धडा घेत पाकिस्तन क्रिकेट बोर्डाने तिकिट दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.