जोक ऑफ द ईअर! शाहीन आफ्रीदीने `या` खेळाडूला दिली ब्रॅडमनची उपमा, सोशल मीडियावर ट्रोल
Shaheen Afridi Mohammad Rizwan: पाकिस्तान के खिलाड़ी अपने प्रदर्शन से ज्यादा बड़बोलेपन और खराब फॉर्म को लेकर चर्चा में रहते हैं. वनडे वर्ल्ड कप को पूरे हुए अभी छह महीने भी नहीं हुए और टीम के दो बार कप्तान बदल गए.
Shaheen Afridi : पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू (Pakistan Cricket) आपल्या खेळापेक्षा वादग्रस्त वक्तव्य आणि खराब फॉर्ममुळे चर्चेत असतात. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बदलण्यात आला. बाबर आझमकडून (Babar Azam) कर्णधारपदा काढून ते शाहीन आफ्रीदीकडे (Shaheen Afridi) सोपवण्यात आलं. पण काही महिन्यातच शाहीन आफ्रीदीची उचलबांगडी करण्यात आली आणि पुन्हा पाकिस्तान क्रिकेटची धुरा शाहीनकडे देण्यात आली. यावर संतापलेल्या शाहीनने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इशाराच दिला होता. याचे परिणाम वाईट होतील असं शाहीनने म्हटलं होतं. या वक्तव्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा शाहीन आफ्रीतीचं एक वक्तव्य चर्चेत आलं असून सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे.
विराट-बाबरचा विक्रम मोडला
पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आलाय. मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर मात केली. त्याधी पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड एक-एक अशा बरोबरीत आहेत. पाकिस्तानच्या या विजयात विकेटकिपर-फलंदाज मोहम्मद रिझवानचं योगदान मोठं होतं. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 3 हजार धावांचा टप्पा गाठणारा मोहम्मद रिझवान हा पहिला खेळाडू ठरलाय. रिझवानने अवघ्या 79 डावात हा विक्रम केलाय.
मोहम्मद रिझवानने बाबर आझम आणि विराट कोहलीलाही याबाबतीत मागे टाकलं आहे. विराट कोहली आणि बाबर आझमने 81 डावात तीन हजार धावांचा टप्पा गाठला होता.
'जोक ऑफ द ईअर'
मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) या कामगिरीचं शाहीन आफ्रिदीने कौतुक केलं आहे. यासाठी त्याने सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाली असून क्रिकेट चाहत्यांनी शाहीनला चांगलंच ट्रोल केलं आहे. शाहीन आफ्रिदीने मोहम्मद रिझवानची तुलना चक्क ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली आहे. शाहीनने रिझवानला टी20 क्रिकेटचा ब्रॅडमन म्हटलं आहे. शाहीनने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी वाईट पद्धतीने शाहीनला सुनावलं आहे.
शाहिन आफ्रीदीची पोस्ट
शाहिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'टी20 क्रिकेटचा ब्रॅडमन आणि पाकिस्तानचा सुपरमॅन मोहम्मद रिझवानला 3000 टी20 धावा केल्याबद्दुल शुभेच्छा. तुझ्या कामगिरीने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. अशीच कामगिरी करत राहा चॅम्पियन, तू अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेस'
क्रिकेट चाहत्यांकडून ट्रोल
शाहीनच्या या पोस्टवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. एका युजरने हा जोक ऑफ द ईअर असल्याचं म्हटलंय. तर काहींनी रिझवानला ब्रॅडमन नाही तर ब्रेड-मॅन असं म्हटलं आहे.