Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघातील एका माजी हिंदू क्रिकेटरने आपल्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. या क्रिकेटपटूंने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात पाकिस्तान खेळाडू श्रीलंकेच्या एका खेळाडूलाही धर्म परिवर्तनासाठी सांगत असल्याचं दिसंतय. हा व्हिडिओने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया (Danish Kaneria) आपल्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. आता पाकिस्तान क्रिकेट संघावर (Pakistan) केलेल्या आरोपांमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ड्रेसिंग रुमपासून मैदानापर्यंत आपल्याला वाईट वागणूक मिळत होती, इतकंच नाही तर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला जायचा असा आरोप दानिक कनेरियाने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कनेरियाने व्हिडिओ केला शेअर
दानिश कनेरियाने X (आधीच ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद (Ahmed Shehzad) श्रीलंकेचा खेळाडू तिलकरत्ने दिलशानला (Tillakaratne Dilshan) धर्मपरिवर्तनाबाबत सांगत असल्याचं दिसतंय. व्हिडिओत शहजाद दिलशान सांगतोय, तूम्ही गैर मुस्लिम असाल  आणि मुस्लीम धर्म स्विकाराल तर आयुष्यात काहीही करा थेट स्वर्ग प्राप्त होतो, यावर दिलशान त्याला हसून प्रतिक्रिया देताना दिसतोय. दानिश कनेरियाना हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय. माझ्याबरोबर सुद्धा असंच होत होतं, ड्रेसिंग रुम असूदे, खेळाचं मैदान असू दे की डाइनिंग टेबल असू दे, माझ्यावर दबाव टाकला जात होता.


दानिश कनेरियाने शेअर केलेला हा व्हिडिओ 2014 मध्ये दांबुला इथे खेळलेल्या गेल्या पाकिस्तान-श्रीलंका एकदिवसीय सामन्याचा आहे. तिलकरत्ने दिलशानचे वडील मुस्लिम आहेत, तर आई बौद्ध धर्मिय आहे. दिलशानचं जन्मावेळी तुवान मोहम्मद दिलशान असं नाव होतं. 1999 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यानंतर आपलं नाव तिलकरत्ने मुदियांसेलगे दिलशान असं ठेवलं. दिलशान आणि त्याची सर्व भांवडं आईच्या धर्माचं पालन करतात. 


पाकिस्तानसाठी खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटर
दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटर आहे. याआधी त्याचा मावसभाऊ अनिल दलपत हा पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळला होता. अनिलचे दोन भाऊ भरत कुमार आणि महेंद्र कुमार हे देखील पाकिस्तानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. आतापर्यंत 7 बिगर मुस्लिम क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानचं संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 



शाहिद आफ्रिदीवरही आरोप
दानिश कनेरियाने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवरही आरोप केला आहे. आपण पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळू नये अशी आफ्रिदीची इच्छा होती, यासाठी तो इतर खेळाडूंना आपल्याविरोधात भडकत असल्याचं कनेरियाने म्हटलं आहे. माझं ध्येय फक्त देशासाठी क्रिकेट खेळणं इतकंच होतं, त्यामुळे त्या वेळी आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचं कनेरियाने म्हटलंय. 


कनेरियाची क्रिकेट कारकिर्द
फिरकी गोलंदाज दानिक कनेरिया पाकिस्तानसाठी 61 कसोटी क्रिकेट खेळला आहे, यात त्याने 261 विकेट घेतल्यात. तर पाकिस्तान संघासाठी तो 8 एकदिवसीय सामनेही खेळला असून यात त्याने 15 विकेट घेतल्या. 2009 मध्ये इंग्लिश काऊंट चॅम्पियनशिपमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात त्याच्यावर बंदी आणण्यात आली.