Prithvi Shaw: `त्याने माझ्याबरोबर...` सपना गीलचा गंभीर आरोप, पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट
Indian Cricket Team: टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जामीनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केला आहे
Prithvi Shaw And Sapna Gill Controversy: टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India va Australia Test Series) चार सामन्याची कसोटी मालिका खेळतेय. या सीरिजदरम्यान टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू मात्र नव्या वादात अडकला आहे. टीम इंडियाच्या युवा क्रिकेटपटूविरोधात सोशल मीडिया इन्फ्लूएंजरने (Social Media Influencers) गंभीर आरोप करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस स्थानकात या खेळाडूविरोधात तब्बल 11 कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पृथ्वी शॉविरोधात FIR
टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंजर सपना गिल (Sapna Gill) यांच्यात सुरु झालेला वाद संपण्याची चिन्ह नाहीत. पृथ्वी शॉच्या कारवार हल्ला आणि त्याच्याबरोबर गैरवर्तुणूक (Misconduct) केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सपना गिल आणि आणखी तीन जणांना मुंबई कोर्टाने (Mumbai Court) जामीन दिला आहे. 10 हजार रुपयांच्या वैयक्तित जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. पण जामीनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पृथ्वी शॉवर छेडछाडीचा आरोप
सपना गिलने पृथ्वी शॉवर छेडछाडीचा आरोप केला आहे. पृथ्वी शॉ शिवाय आशीष सुरेंद्र यादव, बृजेश यांच्यावरही सपना गिलने आरोप केले आहेत. या सर्वांविरोधात 34, 120B, 144, 146, 148, 149, 323, 324, 351, 354, 509 कलमातंरर्गत केस दाखल करण्यात आली आहे
हॉटेल बाहेर झालेला वाद
14 फेब्रुवारीला मुंबईतल्या सांताक्रूज परिसरातील एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉबरोबर कथित गैरवर्तणूक करण्यात आली. तसंच त्याच्या कारवर बेस बॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. सोशल मीडिया इन्फ्लूएंजर सपना गिल आणि तिचा मित्र शोभित ठाकूर यांनी पृथ्वी शॉबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी शॉने सेल्फीला नकार दिल्यानंतर सपना गिल आणि शोभित ठाकूरने त्याच्याबरोबर गैरवर्तणूक केली. याप्रकरणी पृथ्वी शॉने मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सपना गिलला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.