Most wicket taker bowler in test cricket in 2023 : जून वर्ष संपलंय आणि नव्या वर्षाला म्हणजे 2024 ला सुरुवात झालीय. गेल्या वर्षीप्रमाणेच नवं वर्षही क्रिकेटसाठी पॉवरपॅक्ड असणार आहे. गेल्या वर्षात म्हणजे 2023 वर्षात मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या (ICC) तीन ट्रॉफीवर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावलं. त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीवरही नाव कोरलं. वर्ष संपता संपता ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा 7 विकेट राखून पराभव केला. 2023 हे वर्ष ऑस्ट्रेलियासाठी दमदार ठरलं. पण त्याचबरोबर फलंदाजी आणि गोलंदाजीतही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. आयसीसीने 2023 मध्ये सर्वाधक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे, आणि या यादीत पहिल्या दोन स्थानांवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचं नाव आहे. (Most wicket taker bowler in test cricket in 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज नॅथन लिओनचं (Nathan lyon) नाव आहे. लिओनने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 500 विकेटचा टप्पा पूर्ण केलं. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा दुसरा फिरकी गोलंदाज ठरलाय. 2023 या वर्षात लिओनने सर्वाधिक 47 विकेट घेतल्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचाच वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्सचं (Pat Cummins) नाव आहे. कमिन्सने 2023 या वर्षात एकूण 42 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. नॅथन लिओनपासून कमिन्स फक्त 4 विकेट मागे आहे. कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये 252 विकेट घेतल्या आहेत. 


बुमराह, शमी टॉप टेनमध्येही नाहीत
सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह किंवा मोहम्मद शमी या दोघांपैकी एकाचाही टॉपटेनमध्येही समावेश नाही. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा 37 वर्षांचा दिग्गज फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनचा (R Ashwin) समावेश आहे. अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 490 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन हा दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज आहे. 2023 या वर्षात अश्विनने तब्बल 41 विकेट घेतल्यात. तर टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. जडेजाने 2023 या वर्षात 33 विकेट घेतल्यात.


याशिवाय इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड चौथ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 38 विकेट आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 38 विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा प्रभात जयसुर्या याच्या नावावर 30 विकेट जमा असून तो सातव्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचाच वेगवागन गोलंदाज जोस हेजलवूडने 27 विकेट घेतल्या असून तो आठव्या क्रमांकावर आहे.