Team India for T20 World Cup 2025 : महिला टी20 वर्ल्ड कप 2025 साठी बीसीसीआयने (BCCI) महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket Team) घोषणा केली आहे. 15 खेळाडूंच्या यादीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदी स्मृती मंधानाची वर्णी लागली आहे. टी20 वर्ल्ड कप 2025 साठी सोमवारी आयीसीसीने नवं वेळापत्रक जारी केलं होतं. चार ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात बदल
महिला टी20 वर्ल्ड कप 2025 चं आयोजन बांगलादेशमध्ये होणार होतं. पण बांगलादेशमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने आयसीसीसने बांगलादेशकडून आयोजन काढून घेतलं. 20 ऑगस्टला आयसासीने या स्पर्धेसाठी नव्या ठिकाणाची घोषणा केली. आता ही स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपची सुरुवात 4 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. टीम इंडियात नुकतंच पदार्पण करणाऱ्या युवा खेळाडूलाही या संघात स्थान देण्यात आलं आहे. 



टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सुरुवातील दोन सराव सामने खेळणार आहे. यात 29 सप्टेंबरल टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. तर 1 ऑक्टोबरला टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला भिडेल. क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याची. हा हायव्होल्टेज सामना 6 ऑक्टोबरला रंगेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याची सुरुवात होईल. त्यानंतर 9 आणि 13 ऑक्टोबरला टीम इंडिया श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला टक्कर देईल. 



टी20 वर्ल्ड कप साठी भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकार, ए. रेड्डी, रेनुका सिंह ठाकुर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटिल, एस संजीवन


राखीव - उमा छेत्री, तनुजा कनवर, साइमा ठाकुर.