हम भी किसिसे कम नही! मिताली राजचा विक्रम, श्रीलंकेच्या खेळाडूला धाडलं मागे
मिताली राजचं अनोखं रेकॉर्ड
मुंबई : आजची स्त्री कोणापेक्षा कमी नाही. आज महिलांनी सर्वच क्षेत्रात स्वत:चं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दरम्यान महिला क्रिकेट विश्वातील मिताली राजने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनोखं विक्रम केलं आहे. भारतीय क्रिकेट वनडे टीमची कर्णधार मिताली राजने रविवारी (7 मार्च) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विशेष विक्रम नोंदविला. मितालीच्या या कामगिरी मुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मितालीने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले आहे. सांगायचं झालं तर कोरोना महामारीमुळे 1 वर्षापेक्षा जास्त काळानंतर भारतीय महिला संघ सामना खेळत आहे. मितालीने 26 जून 1999 रोजी आयर्लंड विरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता मितालीची वनडेमधील कारकीर्द 21 वर्षे 254 दिवसांची झाली आहे.
श्रीलंकेच्या सनथ जयसुर्यातचं वनडे मधील करकीर्द 21 वर्ष 184 दिवसांची आहे. सनथने 26 डिसेंबर 1989 ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तिने अखेरचा सामना 26 जून 2011 इंग्लंड विरूद्ध खेळला होता.