`माझा कोणीच मित्र नाही` टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर पृथ्वी शॉ असं का म्हणाला?
Prithvi Shaw: अगदी कमी वयात आक्रमक फलंदाज म्हणून टीम इंडियात एन्ट्री केली. पण टीम इंडियात तो स्वत:ची जागा बनवण्यात कमी पडला. पृथ्वी शॉ गेल्या दोन वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
Prithvi Shaw statement in hindi: भारतीय क्रिकेटचं भवितव्य म्हणून पाहिल्या गेलेला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आता टीम इंडियात (Team India) एन्ट्री करण्यासाठी धडपड करतोय. वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचं मिश्रण असल्याचं पृथ्वी शॉबद्दल बोललं जायचं. स्थानिक क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अगदी कमी वयात त्याने टीम इंडियात त्याने जागा पटकावली. सलामीचा आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या कामगिरीत त्याला सातत्य राखता आलं नाही. परिणामी टीम इंडियातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
पृथ्वी शॉला विंडीज दौऱ्यातूनही वगळलं
2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आणि आता 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्याच दौऱ्यात त्याला वगळण्यात आलं आहे. टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानतंर पृथ्वी शॉने मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियातून बाहेर काढण्याचं कोणतंच कारण मला सांगण्यत आलेलं नाही. काही जणं सांगत होती, फिटनेसमुळे संघात स्थान देण्यात आलेलं नाही. पण मी नॅशनल क्रिकेट अकॅडेमत जाऊन तिथल्या सर्व टेस्ट पास झालो. त्यानतंर स्थानक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगल्या धावा केल्या. त्यामुळे मला टी20 संघात संधी मिळाली. पण आता वेस्टइंडिजविरुद्धच्या मालिकेत मला बाहेर बसवण्यात आलं आहे, त्यामुळे मी प्रचंड निराश आहे, असं पृथ्वी शॉने म्हटलं आहे.
क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. मी आता एकटं राहणं पसंद करु लागलो आहे, माधे कोणीच मित्र नाहीत. लोकं माझ्याबद्दल तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा करतायत, पण जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे, मी कसा आहे. या पिढीबरोबर असंच होतंय. तुम्ही एखादं वक्तव्य केलं, तर पुढच्याच दिवशी ते सोशल मीडियावर येतं. अशी व्यथाच पृथ्वी शॉने मांडली.
पृथ्वी शॉची क्रिकेट कारकिर्द
23 वर्षांच्या पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध 2018 त कसोटी क्रिकेटमध्ये तर 2020 ला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पदार्पण केलं. 2020 मध्ये पृथ्वी शेवटचा कसोटी सामना तर तर 2021 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर तब्बल दोन वर्ष तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. पृथ्वी शॉ टीम इंडियासाठी 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 339, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 189 तर टी20 सामन्यात भोपळा केला आहे.