दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कर्णधार केएल राहुलला मैदानातच उल्ट्या, Video
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार केएल राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जोरदार तयारी करताना दिसोतय. 17 डिसेंबरबासून भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला सुरुवात होतेय.
India Tour of South Africa : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर या दौऱ्यात तीन टी20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी टी20 मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. टी20 मालिकेनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. येत्या 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकत टीम इंडियाची (Team India) धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी केएल राहुलसह काही खेळाडू अद्याप दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झालेले नाहीत. पण या मालिकेसाठी सर्वच खेळाडू जोरदार सराव करतायत. यादरम्यानचा एक व्हिडिओ केएल राहुलने (KL Rahul) आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
व्हिडिओ पाहून टेन्शन वाढलं
पण हा व्हिडिओ पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं. कारण सराव करताना कर्णधार केएल राहुलला मैदानात उल्ट्या झाल्या. शेअर केलेल्या व्हिडिओत केएल राहुल सरावानंतर मैदानाच्या बाहेर उल्ट्या करताना दिसत आहे. केएल राहुल याने शेअर केलेल्या व्हिडिओत तो मैदानावर जोरदार सराव करताना दिसत आहे. सुरुवातीला तो रनिंग करतो, त्यानंतर स्ट्रेचिंग करताना दिसतोय. याचदरम्यान त्याच्या पोटात दुखू लागतं. त्यानंतर तो मैदानाबाहेर जातो आणि उल्ट्या करत असताना दिसतोय. उल्ट्या केल्यानंतर राहुलला थोडासा आराम मिळाल्याचं दिसंतय.
या व्हिडिओ पाहून केएल राहुलची तब्येत बिघडलीय का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. या सराब शिबिरात केएल राहुल याच्याबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही दिसत आहे. फलंदाजांचं आयुष्य किती आरामदायी असतं असा टोलाही जसप्रीत बुमराह केएल राहुलला लगावताना या व्हिडिओ दिसतोय.
केएल राहुलचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केएल राहुलकडे एकदिवसीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. केएल राहुलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 9 एकदिवसीय सामन्यात नेतृत्व केलं आहे. यात तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी 2022 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी केएल राहुल कर्णधार होता. ही मालिका टीम इंडियाला गमवावी लागली होती. या पराभवाचा बदला घेण्यासाठी केएल राहुल सज्ज झालाय.