Virat Kohli-Gautam Gambhir Deepfake Video : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशवर 280 धावांनी मात करत आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. पण कसोटी सामन्याच्या आधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट आणि गंभीर एकमेकांना किस (Kissing Video) करताना दिसत आहेत. या व्हिडिओने एकच खळबळ उडाली असून सत्य काही वेगळंच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट-गंभीरचा किसिंग व्हिडिओ


आयपीएलमध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या वादाचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. पण आता टीम इंडियात या दोघांचं चांगलं बॉण्डिंग दिसत आहे. विराट आणि गंभीर अनेकवेळा मैदानात सरावाबदद्ल, सामन्याबद्दल चर्चा करताना दिसतायत. पण यादरम्यान दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सरावादरम्यान मैदानात दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहे. वास्तविक विराट आणि गंभीरच्या एका फोटोशी छेडछाड करण्यात आली असून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने याचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.


कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सरावादरम्यान विराट आणि गंभीर एकमेकांशी बोलत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत गंभीर कोहलीच्या दाढीला हात लावताना दिसत आहे. विराटच्या दाढीला काहीतरी लागलं होतं, ते काढण्यासाठी गंभीरने त्याच्या दाढीला हात लावला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याच फोटोला एडिट करुन त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.



डीपफेक व्हिडिओचे शिकार


डीपफेक व्हिडिओची (DeepFake Video) ही पहिलीच वेळ नाहीए. याआधी अनेक सेलिब्रेटींचे फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करुन डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आले होते. गेल्या महिन्यातही विराट कोहलीचा एक डिपफेक व्हिडिओ बनवण्यात आला होता. यात विराट शुभमन गिलवर टीका करताना दाखवण्यात आला होता. पण हा व्हिडिओ आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर करत बनवल्याचं उघड झाल होतं. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरचाही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना सामोरं जावं लागलं होतं.