IPL Kolkata Knight Riders : शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने नव्या हंगामापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीची (Jhulan Goswami) महिला कॅरेबियाई प्रीमिअर लीगआधी (Caribbean Premier League) ट्रिनबागो नाईट रायडर्सच्या (TKR) मेंटोरपदी नियुक्ती केली आहे. भारतीय महिला क्रिकेटची तब्बल दोन दशकं गाजवणाऱ्या झूलनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 355 विकेट घेतल्या. 2022 मध्ये झुललने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला कॅरेबियाई प्रीमिअर लीग
महिला कॅरेबियाई प्रीमिअर लीगचा हा चौथा हंगाम आहे. यंदा ही स्पर्धा 21 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान खेळवली जाणार आहे. ट्रिनबागो नाईट रायडर्सने 2021 मध्ये पहिल्या हंगामात जेतेपद पटकावलं होतं. ट्रिनबागो नाईट रायडर्सचं कर्णधारपद स्टार ऑलराऊंडर डिएंड्रा डोटिन हिच्याकडे आहे.


झुलन गोस्वामीकडे जबाबदारी
आता महिला कॅरेबियाई प्रीमिअर लीगच्या चौथ्या हंगामापूर्वी केकेआर व्यवस्थापनाने झुलन गोस्वामीची मेंटोर म्हणून नियुक्ती केली आहे. टीकेआरबरोबर काम करायला मिळणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं झुलनने म्हटलं आहे. केकेआर व्यवस्थापनाचे तीने आभारही मानले आहेत. ट्रिनबागो नाईट रायडर्स संघात भारताच्या जेमिमा रॉड्रिग्स, शिखा पंडे यांच्याबरोबरच मेन लॅगिंग, जेस जोनासेने अशा दिग्गज महिला खेळाडूंचा समावेश आहे. 


महिला क्रिकेटची दिग्गज
झुलन गोस्वामी ही भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू आहे. तब्बल दोन दशकं झुलनने भारतीय महिला संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2002 मध्ये झुलनने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर 2022 पर्यंत ती भारतासाठी खेळत होती. आपल्या या मोठ्या क्रिकेट कारकिर्दीत झुलने टीम इंडियाला अनेक सामने एक हाती जिंकून दिले आहेत. झुलनच्या नावावर कसोटी सामन्यात 44 विकेटची नोंद आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीने 255 विकेट घेतल्यात. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तीने 56 विकेट घेतल्यात. 


21 ऑगस्टपासून CPL ची सुरुवात
कॅरेबियाई प्रीमिअर लीग 2024 ची सुरुवात पुढच्या महिन्यात म्हणजे 21 ऑगस्टपासून होणार आहे. या स्पर्धेत तीन संघ असून यात  ट्रिनबागो नाईट रायडर्स, बारबाडोस रॉयल्स आणि गयाना अमेजन वॉरियर्स या संघांचा समावेश आहे. तीन संघांमध्ये एकूण सात सामने खेळवले जातील. हे सर्वा सामने ब्रायन लारा क्रिकेट अकॅडमीत खेळवले जातील. कॅरेबियाई प्रीमिअर लीगचा हा तिसरा हंगाम आहे. पहिल्या हंगामात ट्रिनबागो नाईट रायडर्सने जेतेपद पटकावलं. तर दुसऱ्या हंगामात बारबाडोस रॉयल्सने ट्ऱॉफी पटकावली.