T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा सर्वाधत यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनीची (MS Dhoni) गणना होते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) एकदिवसीय वर्ल्ड कप, टी20 वर्ल्ड कप पटकावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन आता धोनीला चार वर्ष पूर्ण होतील. एमएस धोनी टीम इंडियासाठी शेवटचा टी20 सामना पाच वर्षांपूर्वी खेळला होता. तर टी20 वर्ल्ड कपच्या इतिसातात धोनीने तब्बल सहावेळा भारतीय संघाचा प्रतिनिधित्व केलंय. या दरम्यान धोनीने अनेक विक्रम (Records) रचले. यातला एक विक्रम असा आहे, यात धोनी आजही नंबर वन आहे. अनेक दिग्गज खेळाडूही या विक्रमापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीचा विक्रम अबाधित
टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात विकेटच्या मागे सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये धोनी 33 सामने खेळला आहे. यात धोनीने 32 फलंदाजांना स्टम्पमागे बाद केलं आहे. धोनीने 21 वेळा झेल टिपले आहेत. तर 11 वेळा फलंदाजंना स्टम्प आऊट केलं आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानाच विकेटकिपर कामरान अकमल आहे. अकमलने स्टम्पमागे 30 फलंदाजांना बाद केलंय. भारतीय विकेटकिपरमध्ये धोनीनंतर ऋषभ पंतच्या नावावर स्टम्पमागे सर्वाधिक विकेट आहेत. पतंने 11 सामन्यात 12 फलंदाजांना बाद केलं आहे. यात 11 वेळा झेल आणि एकदा स्टम्पआऊट बाद केलं आहे. 


सर्वाधिक विजयाचा विक्रम मोडला
एमएस धोनीचा एक विक्रम याच वर्षी रोहित शर्माने मागे टाकला. टी20 आंतराराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये धोनी अव्वल स्थानावर होता. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 70 सामन्यांपैकी 41 सामन्यात विजय मिळवला. पण रोहित शर्माने टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध विजय मिळवता हा विक्रम मागे टाकला. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने 58 सामन्यांपैकी तब्बल 45 विजय मिळवलेत.


टीम इंडियाची दणदणीत सुरुवात
टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या हंगामात म्हणजे 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने ट्ऱॉफीवर नाव कोरलं होतं. पण त्यानंतर टीम इंडियाला एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. ही उणीव रोहित शर्माची टीम इंडिया यंदा भरून काढणार का याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत प्रवेश केला असून पहिला सामना जिंकत दणदणीत सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला. आता दुसऱ्या सामन्यात 22 जूनला भारत विरुद्ध बांगलादेश सामना होणार आहे. तर 24 जुलैला भारत-ऑस्ट्रेलिया सामना रंगणार आहे.