India vs Ireland T20 series 2023: बऱ्याच कालावधीनंतर भारताचा प्रमुख वेगवागन गोलंदाज जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) पुनरागमन होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया (Team India) आयर्लंड दौऱ्यावर (Ireland Tour) जाणार असून जसप्रीत बुहराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) संघाचा उपकर्णधार असेल. या दौऱ्यासाठी टीम इंडियातल्या मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण दौऱ्याआधीच कर्णधार बुमराहसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दौऱ्यातून मुख्य व्यक्तीच गायब
आयर्लंड दौऱ्यात जो भारतीय संघ जाणार आहे, त्या संघाबरोबर मुख्य कोचच नसणार आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) किंवा व्हि व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman) या दोघांचीही नावं मुख्य कोच म्हणून आयर्लंड दौऱ्यात नाहीत. भारत आणि आयर्लंड दरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 18, 20 आणि 23 ऑगस्टला हे सामने खेळवले जाणार असून सर्व सामने डबलिन इथे होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघ 15 ऑगस्टला डबलिनसाठी रवाना होईल. पण या संघाबरोबर मुख्य कोच दौऱ्यावर जाणार नाहीत. 


क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 सीरीजसाठा अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये आहेत. द्रविडच्या अनुपस्थितीत व्ही व्ही एस लक्ष्मणकजे कोटचिंग स्टाफची जबाबदारी असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण व्ही व्ही एस लक्ष्मण या दौऱ्यावर जाणार नसल्याचं समोर आलं आहे. साईराज बहुतुले, आणि सितांशु कोटक यांच्यासह इतर कोच भारतीय क्रिकेट संघाबरोबर असतील. 


बुमराहसाठी महत्त्वाची मालिका
आयर्लंड दौऱ्यात टी20 मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबादारी सांभाळणाऱ्या जसप्रीत बुमराहसाठी हा दौरा खुप महत्वाचा असणार आहे. या दौऱ्यातून बुमराहच्या फिटनेसची चाचणी होणार आहे. बुमराह टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना जुलै 2022मध्ये तर शेवटचा टी20 सामना सप्टेंबर 2022 खेळला होता. जुलै 2022 मध्येच तो शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्येही तो खेळला नव्हता. म्हणजे जवळपास एक वर्ष बुमरहा टीम इंडियापासून दूर आहे. बुमराहने 30 कसोटी सामन्यात 128, 72  एकदिवसीय सामन्यात 121, आणि 60 टी20 सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत. तर 120 IPL सामन्यात त्याच्या नावावर 145 विकेट जमा आहेत. 


दरम्यान आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया दोन टप्प्यात पोहोचणार आहे. काही खेळाडू वेस्टइंडिजविरुद्धच्या दोन 20 सामन्यांसाठी अमेरिकेत आहेत, ते खेळाडू मालिका आटोपून थेट आयर्लंडसाठी रवाना होती. तर दुसरी बॅट 15 ऑगस्टला मुंबईतून आयर्लंडसाठी रवाना होतील. 


आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघ
जसप्रीत बुमराह (कर्णधार),  ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार),  यशस्वी जायसवाल,  तिलक वर्मा,  रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर),  जितेश शर्मा (विकेटकीपर),  शिवम दुबे,  वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.


आयर्लंडचा संघ : पॉल स्टर्लिंग (कर्णधार),  एंड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, थियो वॅन वोर्कोम, बेन व्हाइट, क्रेग यंग