Team India Squad for Asia Cup : एशिया कप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. 17 खेळाडूंच्या संघात युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्माची (Tilak Verma) सरप्राईज एन्ट्री झाली आहे. तिलक वर्माने वेस्टइंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत दमदार कामगिरी केली होती. युवा खेळाडूंना संधी देतानाच भारताचे स्टार खेळाडू आर अश्विन (Ravichandran Ashwin) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांना मात्र बीसीसीआयने वगळलं आहे. युजवेंद्र चहलला संघातून वगळल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पत्रकार परिषेदत कर्णधार रोहित शर्माला अश्विन आणि चहल यांच्या प्रश्न विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर उत्तर देताना रोहित शर्माने हे दोनही खेळाडू विश्वचषक स्पर्धेच्या प्लानचा हिस्सा आहेत, असं स्पष्ट केलं आहे. आर अश्विन, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासहित ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी वर्ल्ड कप स्पर्धेचे दरवाजे बंद झाले असं नाही, आम्हाला त्यांना बाहेर ठेवावं लागलं कारण संघात केवळ 17 खेळाडूंना संधी मिळू शकते. 


अक्षरला संघात एन्ट्री
आर अश्विन आणि चहलला संघाबाहेर बसवलं असतानाच अक्षर पटेल याला संघात स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावरही रोहित शर्माने स्पष्टीकरण दिलं आहे. संघाला आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणऱ्या खेळाडूची गरज आहे. अक्षरने गेल्या काही सामन्यात या क्रमांकावर फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. अक्षर संघात असल्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीचाही पर्याय मिळतो. भारतीय संघाच्या फलंदाजीत पहिल्या तीन क्रमांकावर बदल केला जाणार नाही. रोहित - शुभमन गिल ओपनिंग करतील, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल असंही रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. 


राहुल पूर्णपणे फिट?
एशिया कप साठीच्या संघात केएल राहुलचं पुनरागमन झालं आहे. पण के एल राहुल अद्याप पूर्णपणे फिट नसल्याचं कळतंय. यावर पहिल्या सामन्यापर्यंत राहुल पूर्णपणे तंदरुस्त होईल असा विश्वास चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांनी व्यक्त केला आहे. केएल राहुल याला फलंदाज आणि विकेटकिपर म्हणून संघात घेण्यात आलाय. स्पर्धेपर्यंत राहुल फिट झाला नाही तर बॅकअप प्लान म्हणून संजू सॅमसनला स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात घेण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरही पूर्णपण फिट झाला आहे. 


एशिया कपसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा