Ishan Kishan : विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन जवळपास वर्षभरापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर (Team India) आहे. 2023 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होती. हा दौरा अर्धवट सोडत ईशान किशन (Ishan Kishan) भारतात परतला. त्यानंतर त्याला टीम इंडियातून डच्चू देण्यात आला. बीसीसीआयच्या वार्षिक करारातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्या आला. टी20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आलं नव्हतं. तर नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातूनही ईशान किशनला वगळण्यात आलं. पण आता ईशान किशनसाठी एक चांगली बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान किशनवर संघाची जबाबदारी
टीम इंडियात पुनरागमच्या दिशेने ईशान किशनने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. ईशान किशन लवकरच मैदानात परतणार आहे. बुच्ची बाबू ट्रॉफीत (Buchi Babu Tournament 2024) ईशान किशन झारखंड (Jharkhand) संघाचं नेतृत्व करतान दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे गेल्या अनेक काळापासून ईशान किशन स्थानिक क्रिकेटपासून दूर होता. टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर बीसीसीआयने ईशानला स्थानिक क्रिकेट खेळण्याची तंबी दिली होती. त्यानंतर आता ईशान किशन पुन्हा एकदा स्थानिक क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 


झारखंड संघाचं नेतृत्व
बुच्ची बाबू ट्रॉफीत झारखंड संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ईशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. झारखंडचा पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध असणार आहे. ईशान किशनची स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी आहे. आता या स्पर्धेत ईशान किशनने चांगली केल्यास त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा खुले होण्याची शक्यता आहे. 


बुच्ची बाबू ट्ऱॉफी
बुच्ची बाबू ट्ऱॉफी स्पर्धेची सुरुवात 15 ऑगस्टपासून होईल. 2 सप्टेंबर सेमीफायनल तर 8 सप्टेंबरला फायनल खेळवली जाणार आहे. चार दिवसांच्या या स्पर्धेत बारा संघ सहभागी होणार आहे. बारा संघांना चार चार ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेत तामिळनाडू राज्याचे दोन संघ खेळतात. एक तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट इलेव्हन आणि दुसरा संघ म्हणटी टीएनसीए इलेव्हन. ही स्पर्धा तामिळनाडूत खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने नाथम, कोईंबतूर, आणि तिरुनेवेलीमध्ये खेळवले जातील. जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 3 लाख रुपयांच बक्षिस दिलं जात. तर उपविजेत्या संघाला 2 लाख रोख पारितोषिक दिलं जातं. या स्पर्धेत ईशान किशन, सरफराज खान, सूर्यकुमार यादव या सारखे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. 


बुच्ची बाबू ट्रॉफीतले ग्रुप
 ग्रुप  ए - झारखंड, मध्य प्रदेश आणि हैदराबाद


ग्रुप बी - रेलवे, गुजरात आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट इलेवन


ग्रुप सी - मुंबई, हरियाणा आणि टीएनसीए इलेव्हन


ग्रुप डी - जम्मू-कश्मीर, छतीसगड आणि बडोदा