Rishabh Pant on MS Dhoni: भारताचा युवा विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) एक मोठा खुलासा केला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबर (Mahendrasingh Dhoni) तुलना होत असल्याने आपल्यावरचा ताण वाढला होता. हा ताण सहन करण्यापलिकडे गेला होता असं ऋषभ पंतने एका मुलाखतीत सांगितलं आहे. डिसेंबर 2022 मध्ये एका भीषण अपघातात (Accident) ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने त्याचा जीव वाचला. पंत सध्या या दुखापतीतून सावरतोय. एका वर्षाहून अधिक काळ तो टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. यादरम्यान एका मुलाखतीत ऋषभ पंतने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसातील संघर्ष सांगितला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रुममध्ये जाऊ रडायचो'
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत ऋषभ पंतने महेंद्रसिंग धोनीबाबत वक्तव्य केलं. टीम इंडियात संधी मिळाल्यानंतर आपली तुलाना एमएस धोनीबरोबर केली जात होती. धोनी महान खेळाडू आहे. त्याच्याबरोबर तुलना होत असल्याने आपल्यावर खूप तणाव होता. अनेकवेळा रुममध्ये जाऊन खूप रडायचो असं पंतने सांगितलं. मोहालीमधल्या एका सामन्यात माझ्याकडून स्टम्पिंगची संधी हुकली. यावेळी प्रेक्षक धोनी-धोनी ओरडू लागले. हा ताण आपण सहन करु शकत नव्हतो, असं पंतने म्हटलंय. 


धोनीबरोबरच नातं
ऋषभ पंतने एमएस धोनीबरोबरचे आपल्या शिष्य-गुरुच्या संबंधांचाही खुलासा केला आहे. धोनी आपल्यासाठी काय आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. मी माझी प्रत्येक गोष्ट त्याच्याबरोबर शेअर करतो. धोनीने आपलं प्रत्येक म्हणणं ऐकून घेतो, प्रसंगी सल्लाही देतो. धोनीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असं ऋषभ पंतने सांगितलं. 


तुलना करणं चुकीचं
एमएस धोनीबरोबर आपली तुलना करणं चुकीचं असल्याचं पंतने म्हटलंय. ऋषभ पंत टीम इंडियात धोनीला पर्याय ठरणार का अशी चर्चा रंगू लागली. ही तुलना का होते. माहीभाईने 500 सामने खेळलेत, मी केवळ पाच सामने खेळलो होतो, त्याचा क्रिकेटमधला प्रवास खूप मोठा आहे. धोनीबरोबर आपली तुलना होऊ शकत नसल्याचं पंतने स्पष्ट केलं. 


युवराज सिंगचेही मानले आभार
आपल्या मुलाखतीत ऋषभ पंतने युवराज सिंगचेही आभार मानले. मी आयुष्यभर त्याचा कर्जदार राहिन असं पंतने म्हटलंय. मी ज्युनिअर होतो आणि संघात अनेक सिनिअर खेळाडू होते. युवराज सिंग, महेंद्र सिंग असे सिनिअर खेळाडू त्यावेळी संघात होते. पण या खेळाडूंनी कधी जाणवू दिलं नाही. त्यांनी संघात आपलं स्वागत खूप आदरपूर्वक केलं. टीम इंडियाची हीच खासियत असल्याचं पंतने सांगितलं.