Team India: क्रिकेट जगतातील सर्वात मोठी इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2023) अर्थात आयपीएल स्पर्धा सध्या सुरु आहे. येत्या 28 मेला आयपीएलची फायनल रंगणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे जुनच्या पहिल्याच आठवड्यात भारत आण ऑस्ट्रिलयादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना खेळवला जाणार आहे. लंडनच्या ओव्हल क्रिकेट ग्राऊंडवर (Ovel Cricket Ground) 7 जूनपासून दोन्ही संघात चॅम्पियनशिपची लढत रंगेल. पण त्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला (Team India) एक मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळाडू स्पर्धेबाहेर
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर केएल राहुल (KL Rahul) संपूर्ण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला मुकणार आहे. त्याआधीच राहुल आयपीएलमधूनही बाहेर पडला आहे. केएल राहुलने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) याबाबतची माहिती शेअर केली आहे. केएल राहुलने आपला फोटो शेअर करत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर स्पर्धेतून खेळणार नसल्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. लवकरच दुखापतग्रस्त मांडीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, मैदानावर लवकरात लवकर परतण्याचा माझा प्रयत्न असले. स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय खूप कठिण आहे, पण सध्या तो महत्वाचा आहे असं के एल राहुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


आयपीएलमधूनही बाहेर 
आयपीएलमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाचं नेतृत्व करतो. पण आता राहुल आयपीएलमध्येही खेळू शकणार नाहीए. यावरही केएल राहुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लखनऊ संघाचा कर्णधार या नात्याने माझ्या निर्णयाचं दु:ख वाटतं. ऐक मोक्याची क्षणी मला संघाची साथ सोडावी लागत आहे. पण मला माझ्या खेळाडूंवर भरोवसा आहे ते मैदानावर त्यांचे 100 टक्के प्रयत्न करतील. माझा संघाला नेहमीच पाठिंबा असेल आणि प्रत्येक सामना मी पाहिन असं के एल राहुलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


तसंच केएल राहुलने आपल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स टीम व्यवस्थापन आणि बीसीसीआयला त्याने धन्यवाद दिले आहेत. सहखेळाडूंनी मला माझ्या कठिण प्रसंगात साथ दिली, त्याबद्दल त्यांचे ऋणी असल्याचंही राहुलने म्हटलंय. दरम्यान केएल राहुलच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी कोणत्या खेळाडूची वर्णी लागते याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 



WTC साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकुर, मोहम्‍मद शमी, मोहम्‍मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जयदेव उनादकट आणि उमेश यादव.