Yashasvi Jaiswal Test Ranking : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने (Team India) 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने तब्बल 434 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला होता तो टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal). दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने तब्बल 214 धावांची नाबाद खेळी केली होती. या कामगिरीचा यशस्वी जयस्वालला आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) मोठा फायदा झालाय. आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात यशस्वी जयस्वालने मोठी झेप घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा बोलबाला
राजकोट कसोटीत डबल सेंच्युरी करणाऱ्या यशस्वी जयस्वलाने तब्बल 14 स्थानांचा फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत यशस्वी आता 15व्या स्थानावर पोहोचला आहे. तर एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत टॉप-5 मध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. यात शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे.


जयस्वालची 'यशस्वी' कामगिरी
कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांना बोलबाला पाहिला मिळत आहे. यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत दोनवेळा डबल सेंच्युरी केली. विशाखापट्टणममध्ये खेळवलेल्या दुसऱ्या कसोटीत जयशस्वी जयस्वालने 209 धावांची खेळी केली होती. तर तिसऱ्या म्हणजे राजकोट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वलाने नाबाद 214 धावा केल्या. याशिवाय हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही यशस्वीने 80 धावांची दमदार खेळी केली होती. 


या मालिकेत यशस्वी जयस्वालने तीन कसोटी सामन्यात तब्बल 545 धावा केल्या आहेत. यात दोन डबल सेंच्युरीचा समावेश आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे त्याच्या आसपासही कोणी नाही.


आयसीसी कसोटी क्रमवारी
आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन 893 पॉईंटसह पहिल्या स्थानावर आहे. तर स्टिव्ह स्मिथ 818 पॉईंटसह दुसऱ्या, डेरिल मिचेल 780 पॉईंटसहे तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर 768 पॉईंट्सह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, तर पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा जो रुट 766 पॉईंटसह पाचव्य क्रमांकावर आहे. 


आयसीसी एकदिवसीय क्रमवारी
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल 801 पॉईंटसह दुसऱ्या, विराट कोहली 768 पॉईंटसह तिसऱ्या, रोहित शर्मा 746 पॉईंटसह चौथ्या, तर न्यूझीलंडटा डेरिल मिचेल 728 पॉईंटसह पाचव्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 824 पॉईंट जमा आहेत.