Rohit Sharma : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच कसोटी मालिकांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (India-Australia Border-Gavaskar Test Series) खेळवली जाणार आहे. याआधी 2020-21 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाहीए. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार वैयक्तिक कारणामुळे रोहित शर्माने पहिल्या दोन सामन्यातून माघार घेतली असून बीसीसीआयला याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणून रोहित शर्माने घेतली माघार?
सोशलम मीडियावर रोहित शर्माबाबतचं एक वृत्त जोरदार व्हायरल झालं आहे. रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या कारणामुळे रोहित शर्मा दोन कसोटी सामन्यात खेळणार नाहीए. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचा (Ritika Sajdeh) एक व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रितिका प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं जात आहे. रोहित आणि रितिका यांना 2018 मध्ये कन्यारत्न झालं, मुलीचं नावं त्यांनी समायरा असं ठेवलंयय त्यानंतर आता सहा वर्षांनी रोहित आणि रितिका यांच्या आयुष्यात दुसऱ्यांदा गुड न्यूज येणार असल्याचं म्हटलं जात आहे.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 6 डिसेंबरला एडिलेडमध्ये रंगणार आहे. या दोन सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याची शक्यता आहे. बीसीसीआच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. 


भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका
बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 16 ऑक्टोबरपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतातच ही कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पण सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते बॉर्डर-गावस्कर ट्ऱॉफीवर. गेल्या दोन दौऱ्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली आहे. यावेळी चार सामन्यांपैकी 5 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यातल्या दोन सामन्यांना रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे. 


टीम इंडियाचा कर्णधार कोण?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा पहिल्या दोन सामन्यात खेळला नाही तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. तर रोहित शर्माच्या जागी टीम इंडियात अभिमन्यू मिथूनला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये अभिमन्यूने दमदार कामगिरी केलीय.