टीम इंडियाकडून सातत्याने दुर्लक्ष, आता `या` देशात खेळणार व्यंकटेश अय्यर
Vyankatesh Iyer : भारत आणि श्रीलंकादरम्यान दोन ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कमबॅक केलंय. तर दुसरीकडे टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज दुसऱ्या देशात खेळताना दिसणार आहे.
Vyankatesh Iyer : भारत आणि श्रीलंकादरम्यान दोन ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियात (Team India) विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांनी कमबॅक केलं आहे. एकीकडे भारत-श्रीलंकादरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याकडे लक्ष लागलं असताना दुसरीकडे टीम इंडियाचा डावखुरा आक्रमक फलंदाज दुसऱ्या देशात खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर या खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले. पण त्याच वेगाने त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंदही झाले.
या देशात खेळताना दिसणार
टीम इंडियाचा ऑलराऊंड व्यंकटेश अय्यर (Vyanktesh Iyer) आता इंग्लंडमध्ये खेळताना दिसणार आहे. व्यंकटेश अय्यरने काऊंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) लँकशायर संघाशी करार केला आहे. अय्यर लँकशायरसाठी वन डे कप आणि दोन काऊंटी चॅम्पियनशिप सामने खेळणार आहे. तब्बल पाच आठवडे व्यंकटेश अय्यर इंग्लंडमध्ये असणार आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची अय्यरची ही पहिलीच वेळ आहे. व्यंकटेश अय्यर आधी फारूख इंजिनिअर, सौरभ गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण लँकशायर संघाकडून खेळले आहेत.
संघासाठी विजयी कामगिरी करण्याचा इरादा
लँकशायर संघाशी करार झाल्यानंतर व्यंकटेश अय्यरने पहिल्यांदा काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. लँकशायर हा ऐतिहासिक क्लब आहे, या क्लबकडून खेळताना अनेक भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. फारुख इंजिनिअर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नुकतंच वॉशिंग्टन सुंदर लँकशायर संघाकडून खेळले आहेत. हीच परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे, असं अय्यरने म्हटलंय. इंग्लंडमध्ये लाल आणि सफेद चेंडूने खेळताना आपल्या कौशल्याचा कस लागणार आहे. पण मला विश्वास आहे की आपल्या खेळाने इथल्या क्रिकेट चाहत्यांना निराश करणार नाही, दोन्ही फॉर्मेंटमध्ये संघाला विजय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं व्यंकटेश अय्यरने सांगितलंय.
व्यंकटेश अय्यरची क्रिकेट कारकिर्द
व्यंकटेश अय्यरने 20 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 1132 धावा केल्या आहेत. तर 15 विकेटही त्याच्या नावावर जमा आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 102 च्या स्ट्राईक रेटने 43 सामन्यात 1458 धावा केल्यात. यात चार शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
व्यंकटेश अय्यर भारतासाठी दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला असून यात त्याला केवळ 24 धावा करत आल्या आहेत. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण त्याला अवघे दोन सामने खेळता आले. यानंतर टीम इंडियात त्याला संधी मिळालेली नाही.