WPL 2023 : भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) नुकतीच निवृत्ती (Retired) जाहीर केली होती. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेतील दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया आपला शेवटचा सामना खेळणार आहे. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत सानियाने तब्बल 43 डब्ल्यूटीए (WTA) खिताब पटकवे. दुहेरीत प्रथम क्रमांकाचे मानांकनही मिळवण्याचा मानही सानियाकडे आहे. भारतातल्या युवा खेळाडूंची ती आदर्श आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया मिर्झाकडे नवी जबाबदारी
टेनिसमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर सानिया मिर्झा आता क्रिकेटच्या (Cricekt) मैदानात दिसणार आहे. पहिल्या महिला प्रीमिअर लीगमध्ये (Women Premier League) सानिया मिर्झावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला प्रीमिअर लीगमधील (WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) सानिया मिर्झाला संघाची मेंटॉर (Mentor) बनवलं आहे. सानिया मिर्झा तरुण पिढी आणि महिलांसाठी रोल मॉडेल आहे, जागतिक स्तरावरील तिची कामगिरी संघाचं मनोबल उंचावणारी ठरणार आहे, सानियाकडून संघातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असं आरसीबी संघाने म्हटलं आहे. 


आरसीबीचा दमदार संघ
पहिल्या महिला प्रीमिअर लीगसाठी 13 फेब्रुवारीला खेळाडूंची लीलाव प्रक्रिया ((WPL Auction) पार पडली. यात आरसीबीने सर्वाधिक बोली लावत भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मनधानाला आपल्या संघात घेतलं. स्मृती मनधानावर सर्वाधिक 3.40 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. याशिवाय ऑस्ट्रेलियाची ऑलराऊंडक एलिसे पेरी, ऑस्ट्रेलियाची मध्यमगती गोलंदाज मेगन, न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डिवाईन, इंग्लंड संघाची कर्णधार हीइर नाइट, दक्षिण आफ्रिकेची ऑलराऊंडर डेन वान आणि भारताची अंडर19 स्टार ऋचा घोष आरसीबीच्या संघात आहेत.


सानिया मिर्झाची प्रतिक्रिया
आरसीबीने मेंटॉर पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर सानिया मिर्झाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आरसीबी संघाशी जोडलं गेल्याने मला आनंद झाला आहे. महिला प्रीमिअर लीगच्यानिमित्ताने क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल झाल्याची प्रतिक्रिया सानिया मिर्झाने व्यक्त केली आहे. निवृत्तीनंतर क्रिडा क्षेत्रात योगदान देणार असल्याचं सानिया मिर्झाने म्हटलं आहे.