IND vs AFG, T20I Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया (Team India) मायदेशात अफगाणिस्ताविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. येत्या अकरा जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होईल. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) 16 खेळाडूंच्या भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) टी20 क्रिकेटमध्ये पुनरागम केलं आहे. इतकंच काय तर रोहित शर्माकडे टी20 संघाचं कर्णधारपदही सोपवण्यात आलंय. टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी20 क्रिकेटपासून दूर होते. तब्बल 14 महिन्यांनी रोहित-विराटने टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या निर्णयाने आश्चर्य
अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाची निवड करताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला. यानिर्णयाने सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसलाय. या संघातून केएल राहुलला (KL Rahul) वगळण्यात आलं आहे. टीम इंडियाचा विकेटकिपर-फलंदाज केएल राहुलला टी20 क्रिकेटमधून का वगळलं असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जातोय. केएल राहुललच्या जागी विकेटकिपर जितेश शर्मा आणि संजू सॅमसमनला संघात संधी देण्यात आली आहे. पण केएल राहुल जितेश शर्मा आणि संजूपेक्षा जास्त अनुभवी असतानाही त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.


सलामीसाठी अनेक पर्याय
भारताच्या टी20 संघात सलामीसाठी शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना संधी देण्यात आली आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कमबॅकमुळे मधल्या फळीतली जागाही फूल झाली आहे. अशात केएल राहुलला टॉप ऑर्डरमध्ये जागा मिळणं कठिण आहे. टी20 क्रिकेटमध्ये केएल राहुलनने सलामीला फलंदाजी केली आहे. पण शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालच्या येण्याने  केएल राहुलचं सलामीचं स्थान धोक्यात आलंय. 


टी20 विश्वचषकात संधी मिळणार?
अफगाणिस्तान दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देत बीसीसीआय टी20 विश्वचषकासाठी पर्यात शोधण्याचा प्रयत्न करतेय. पण टी20 विश्वचषकात अनुभवी केएल राहुलला भारतीय संघात जागा मिळण्याची जास्त शक्यता आहे. टी20 विश्वचषकाआधी आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. आयपीएलमध्ये केएल राहुल लखनऊ सुरपर जायंटसचं प्रतिनिधित्व करतो. कर्णधार, विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून केएल राहुलने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. या जोरावर त्याला टी20 विश्वचषकात संधी मिळू शकते. पण ईशान किशन, जितेश शर्मा, संजू सॅमसमनच्या यांच्या कामगिरीवरही बरंच काही अवलंबून आहे. 


अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह , आवेश खान, मुकेश कुमार.