विराट कोहलीमुळे 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पोहोचलं क्रिकेट? `हे` ठरलं कारण
Cricket officially confirmed for LA Olympics : जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक गुड न्यूज आहे. तब्बल 128 वर्षांनंतर ऑलम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह पाच नवे क्रीडा प्रकार दिसणार आहेत.
Cricket officially confirmed for LA Olympics : जगभरातील करोडो क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (International Olympic Committee) क्रिकेट खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला आहे. लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) 2028 ला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेट दिसणार आहे. मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने यावर मतदान घेतलं. यात केवळ दोन सदस्यांनी विरोधात मतदान केलं. यानंतर बहुमताच्या जोरावर क्रिकेटचा (Cricket) ऑलिम्पिकमध्ये समावेश केल्याची घोषणा करण्यात आली ऑलिम्पिकमध्ये टी20 फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळलं जाणार आहे. नुकतंच एशियन गेम्समध्येही क्रिकेटचा समावेश करण्यात आला. चीनमध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघाने गोल्ड मेडलची (Gold Medal) कमाई केली.
विराट कोहलीमुळे शक्य
पण तुम्हाला माहित आहे का 2028 ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्यामागे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा मोठा हात आहे. ऑलिम्पिक आयोजनकांनी विराट कोहली हा जगभरातील खेळाडूंसाठी आयडॉल असल्याचं म्हटलं आहे. विराट कोहलीचे सोशल मीडियावर 340 मिलिअन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या अॅथलिट्समध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. फॅन फॉलोईंगच्या बाबतीत विराट कोहली अमेरिकेचे तीन मोठे सुपरस्टार लेबरॉन जेम्स, टॉम ब्रेडी आणि टायगर वूड्स यांच्यापेक्षा खूप पुढे आहे. आणि हिच गोष्ट ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी कारणीभूत ठरली.
गोल्ड मेडलची अपेक्षा
तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. एशियन गेम्सनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेट संघ गोल्ड मेडल मिळवेल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहते बाळगून आहेत. भारतात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये टीम इंडियाने गोल्ड मेडलची कमाई केली होती. या संघात सर्व युवा खेळाडूंचा समावेश होता. हे खेळाडू पुढची काही वर्ष खेळतील यात शंका नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमध्येही भारतीय संघ गोल्ड मेडलसाठी मजबूत दावेदार असेल.
2028 पर्यंत विराट कोहली खेळणार?
विराट कोहलीमुळे ऑलम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश झाला असला तरी 2028 पर्यंत विराट कोहली खेळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 2028 पर्यंत विराट कोहली खेळत असला तरी फास्ट क्रिकेटच्या फॉर्मेटमधून बाहेर पडला असण्याची शक्यता आहे. विराट कोहली लॉस एंजिलस ऑलिम्पिकमध्ये खेळूदे किंवा नको, पण ऑलिम्पिकमध्ये विराट कोहलीचं नाव कायम राहणार हे निश्चित.