मुंबई : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजिंक्यचे मामा राजेंद्र राधाकृष्ण गायकवाड यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाय घसरून अजिंक्यचे मामा विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अंदाजात व्यक्त करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावात मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यास गेले असता अजिंक्यच्या मामांचा पाय घसरला आणि ते विहिरीत कोसळले. 


बराचवेळ होऊन गेले तरी राजेंद्र गायकवाड घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. संशय आल्याने विहिरीत वाकून बघितले असता ते विहिरीत पडलेले दिसले. तात्काळ त्यांना गावकरी आणि नातेवाईकांच्या मदतीने बाहेर काढण्याने आले. प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी देखील नेण्यात आले होते. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. 



बुधवारी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबासह संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान राजेंद्र गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे यांचे मामा असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, भावजयी, तीन बहिणी, मेव्हणे व वडील असा मोठा परिवार आहे.