मुंबई : मिताली राज सध्या एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. ती 22 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाशी जोडली गेली आहे. अलीकडेच तिने एका टीव्ही शोला मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये तिने आपल्या मनातली इच्छा सांगितली. तिने तिला बॉलिवूडमधील कोणत्या व्यक्तीसोबत लग्न करायला आवडेल, याबद्दल वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे क्रिकेटप्रेमिंमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.


मिताली 'कपिल शर्मा शो'मध्ये दिसली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी मिताली राज 'कपिल शर्मा शो'मध्ये दिसली होती. तिच्यासोबत तिचे सहकारी खेळाडू हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी हेही पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कपिल शर्माने रोचक प्रश्न विचारला...


कपिल शर्मा नेहमीच आपल्या शोमध्ये सेलिब्रिटिंकडून काही ना काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मुलाखतीत कपिल शर्माने मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती आणि झुलन गोस्वामी यांना विचारले की तुम्हाला क्रिकेटर्सशी लग्न करायचे आहे की बॉलीवूडच्या कोणत्याही अभिनेत्यासोबत लग्न करायचं आहे?


मितालीला या अभिनेत्याशी करायचंय लग्न


कपिल शर्माच्या प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तर देताना मिताली राज म्हणाली, बॉलिवूडशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी लग्न करायला माझी हरकत नाही, परंतु मला जो आवडतो त्याचं लग्न आधीच झालं आहे. पुढे तिने आमिर खानचं नाव घेतलं आणि म्हणाली की, मला त्याच्याशी लग्न करायला आवडेल.


...तर हरमनप्रीतला रणवीर आवडतो


हरमनप्रीत कौर गंमतीने कपिल शर्माला म्हणाली, 'मला रणवीर सिंग आवडतो, पण तो तुझ्यावाली सोबत सेट आहे.' खरंतर कपिल शर्माला दीपिका पदुकोणला खूप आवडते असे त्याने अनेकवेळा सांगितले आहे, त्यामुळे हरमनप्रीतने असं वाक्य म्हटलं आहे.


वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) देखील या मुलाखती दरम्यान एकदम मस्तीच्या मूडमध्ये दिसली, ती म्हणाली, 'तुला दीपिका आवडते, मला रणवीर आवडतो, आपण दोघेही आपली सेटिंग करुन घेऊ'. तर दुसरीकडे झुलन गोस्वामीने सांगितले की, मला शाहरुख खान आवडतो.


मितालीचे पहिले प्रेम क्रिकेट नाही


भारताची स्टार फलंदाज मिताली राजने आपल्या खेळाने स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले आहे. पण खेळ हे तिचे पहिले प्रेम नव्हते. वडिलांच्या सांगण्यावरून मिताली राज क्रिकेटर बनली. पण तिला नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासूनच नृत्यांगना व्हायचं होतं. तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले आहे. मितालीचा भाऊ आणि वडीलही माजी क्रिकेटपटू राहिले आहेत.



लग्न न करण्याचे कारण


3 डिसेंबर 1982 रोजी जोधपूर, राजस्थान येथे जन्मलेल्या मिताली राजने अद्याप लग्न केलेले नाही. इतकं वय असूनही लग्न न होण्याचं कारणही खूप खास आहे. मितालीने 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत हे गुपित उघड केले आहे. ती म्हणाली, 'खूप पूर्वी मी लहान असताना हा विचार माझ्या मनात यायचा, पण आता जेव्हा मी विवाहित लोकांना पाहते तेव्हा मला मी अविवाहित असल्याचा खूप आनंद वाटतो.'


ODI मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू


मिताली राजने 1999 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय खेळात पदार्पण केले. तेव्हापासून आजतागायत तिच्या बॅटने धावा काढल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार हून अधिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये तिच्या नावावर 7 शतके आहेत. यासोबतच तिने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 2 हजार 364 धावा केल्या आहेत.