Hardik Pandya-Natasha Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल, अभिनेत्री Natasa Stankovic यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. या दोघांची फिल्मी प्रेमकहाणी आहे. दोघांची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हार्दिक आणि नताशा काही वर्ष लिव-इनमधअये राहिले. लग्नाआधीच नताशा गरोदर राहिली होती. त्यानंतर दोघांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव अगस्त्य असं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक-नताशाचा घटस्फोट?
हार्दिक-नताशा अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. पण आता अचानक दोघं वेगळं होणार असल्याची चर्चा (Divorce Rumours) सुरु झाली आहे. रेडिटवरच्या एका पोस्टमध्ये दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचा दावा करण्यात आला आहे. नताशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हार्दिकचं आडनाव काढून टाकलं आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच वेग आलाय. 


कोण आहे नताशा स्टेनकोविक?
नताआश स्टेनकोविक 32 वर्षांची असून व्यवसायाने ती मॉडेल आणि डान्सर आहे. तीन आपल्या मॉडलिंग कारकिर्दीची सुरुवात 2012 मध्ये केली. सुरुवातीला ती काही प्रसिद्ध ब्रँडसची मॉडेल होती. त्यानंतर तीने अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. 2013 मध्ये नताशाने सत्याग्रह चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती बिग बॉस 8 मध्ये ही सहभागी झाली होती. नताशाने आतापर्यंत 14 चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय काही चित्रपटात तीने आयटम साँगही केलेत.


2020 मध्ये लग्न
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. लग्नाआधीच नताशा गरोदार राहिली. या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव अगस्त्य असं आहे. 14 फेब्रुवरी 2023 हार्दिक आणि नताशाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिंदू पद्धतीने त्यांचा लग्न सोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.


मीडिया रिपोर्टनुसार नताशा स्टेनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातंय. नताशाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरुन पांड्या आडनाव हटवलं आहे. इतकंच काय यंदाच्या आयपीएल हंगामात नताशा एकाही सामन्यात हार्दिक पांड्याला चिअर करण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित होती. 4 मार्चला मुलगा अगस्त्य आणि हार्दिक पांड्याचा वाढिदवस होता. पण दोघांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एकही पोस्ट शेअर करण्यात आली नव्हती. पण घटस्फोटाच्या चर्चेवर दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.