Hardik Pandya : क्रिकेट जगत आणि बॉलिवूडचं (Bollywood) नातं सर्वांनाच परिचीत आहे. भारतीय क्रिकेटर बॉलीवूड अभिनेत्रींना डेट करत असल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. विराट कोहली (Virat Kohli), युवराज सिंग (Yuvraj Singh0 अशा अनेक क्रिकटर्सने बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचं ताजं उदाहरण म्हणजे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशआ स्टेनकोविकची (Natasa Stankovic) जोडी. पण भारताच्या या ऑलराऊंडरचं नाव या आधी अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. 


टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा वाद सुरु असतानाच आता हार्दिक पांड्या आणि परिणीती चोपराच्या (Parineeti Chopra) डेटिंग वादाची चर्चा सुरु झाली आहे. हार्दिक पांड्या आणि परिणीती चोपरा एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या मीडियात येत होत्या.


खरतर हे प्रकरण 2017 मधलं आहे, जेव्हा हार्दिक पांड्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पदार्पणातच हार्दिकने दमदार कामगिरी करत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 75 धावांच्या खेळीने हार्दिकने बॉलिवूडचंही मन जिंकलं. अर्थात यात अभिनेत्रीही मागे नव्हत्या.


या दरम्यानच हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री परिणीती चोपरा एकमेकांना डेट करत असल्याचं जोरदार चर्चा सुरु झाली. पण त्याच दरम्यान हार्दिकचं नवा उर्वशी रौतेलाशीही जोडलं गेलं.


याच चर्चांच्या दरम्यान अचानक हार्दिकचं नाव नताशा स्टेनकोविकशी जोडलं गेलं आणि 2020 मध्ये या दोघांची एंगजमेंटही झाली. चाहत्यांना हा मोठा धक्काच होता. लॉकडाऊन काळात या हार्दिक आणि नताशाने गुपचूप लग्नही उरकलं. आज त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव अगस्त्य ठेवण्यात आलं आहे. 


परिणीती चोपराने काय म्हटलं?
हार्दिकबरोबरच्या डेटिंगबद्दल एका कार्यक्रमात परिणीताल प्रश्न विचारण्यात आला. 'मी सिंगल आहे की नाही हा मुद्दा नाही,पण मी हार्दिक पांड्याला डेट करत नाही हे सत्य आहे' असं उत्तर परिणीतीने दिलं. हार्दिकबरोबरच्या डेटिंगची चर्चा माझ्या कानावर आली आणि हे कधी झालं असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला असं मिश्किल उत्तरही तीने दिलं.


cricketer hardik pandya secret dating with bollywood actress revealed