Harmanpreet Kaur: टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसत आहे. बांग्लादेश विरुद्ध शेवटच्या एक दिवसीय सामन्यात (INDW vs BANW) हरमनप्रीतने राडा घातला. अंपायरच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत हरमनप्रीतने जोरदार हुज्जत घातल्याचं दिसून आलं. हरमनप्रीतने आधी बॅटने स्टंप्स उडवले, त्याचबरोबर मग बांगलादेशच्या चाहत्यांना मधलं बोट दाखवत नाराजी व्यक्ती केल्याचा आरोप केला जातोय. पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये देखील अंपायरला बोलवा म्हणत तिने खोचक टोला लगावला होता. त्यामुळे आता आयसीसीने (ICC Action) देखील हरमनप्रीतवर कारवाई केली आहे. मात्र, हरमनप्रीत आणि वाद हे समीकरण (Harmanpreet Kaur Controversy) नवं नाही. याआधी देखील हरमनप्रीत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.


बनावट पदवी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2017 साली झालेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौरला पंजाब पोलीस खात्यात डीएसपी पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. खुद्द मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंह यांनी तिच्या वर्दीवर स्टार्स लावले होते. मात्र, हरमनप्रीत वादात सापडली अन् तिचं डीएसपीपद (DSP) काढून घेण्यात आलं. पंजाब पोलिसात स्पोर्ट्स कोट्यातून डीएसपी बनलेली हरमनप्रीत कौर ही चौधरी चरण सिंग युनिव्हर्सिटी (CCSU) च्या नावाने बनावट पदवी (Harmanpreet Kaur Fake Degree) लावताना पकडली गेली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी विद्यापीठाच्या दक्षता विभागाकडून गोपनीय चौकशी केली होती. गुणपत्रिकेची कोणतीही नोंद नसल्याचं दक्षता विभागाने सांगितलं होतं.


27 लाखांचा दंड अन् रेल्वे मंत्र्याची मध्यस्ती


पंजाब सरकारकडून डीएसपीची ऑफर मिळताच हरमनप्रीतने पश्चिम रेल्वेची नोकरी सोडली होती. डीएसपीपद काढून घेतल्यानंतर त्यानंतर तिला कॅन्स्टेबलपद देण्यात आलं. पंजाब पोलिसात रुजू होण्यापूर्वी हरमनप्रीत कौर मुंबई रेल्वेत वरिष्ठ सहायक अधीक्षक म्हणून काम करत होती. पाच वर्षांचा करार मोडल्याबद्दल रेल्वेने हरमनप्रीतला 27 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता, परंतु मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर हा दंड मागे घेण्यात आला. त्यावेळी देखील मोठा वाद झाल्याचं समोर आलं होतं.


आणखी वाचा - Harmanpreet Kaur असो वा MS Dhoni; टीम इंडियाच्या 'या' 4 कॅप्टनने घातला अंपायर्ससोबत राडा!


दरम्यान,  हरमनप्रीतला लहानपणापासून वीरेंद्र सेहवागसारखं (Virender Sehwag) क्रिकेटर बनायचं होतं. सेहवागची बॅटिंग पाहून ती मोठी झाली. कठोर परिश्रमानंतर ती अष्टपैलू  खेळाडू बनण्यात यशस्वी झाली. हरमनप्रीत उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी देखील करते. आपल्या मुलीला स्टार खेळाडू बनवायचे हेही वडिलांचे स्वप्न होतं आणि हरमनने वडिलांचं स्वप्न अखेर पूर्ण देखील केलंय.