मुंबई : भारतीय क्रिकेट टीम (India Cricket Team) चा माजी खेळाडू इरफान पठान (Irfan Pathan) ने कोरोना व्हायरस (CoronaVirus) मुळे देशात लॉकडाऊन (Lockdown)असल्याने लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. ज्यासाठी त्याने क्रिकेटच्या भाषेत लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफान पठानने ट्विटरवर म्हटलं की, 'कोरोना व्हायरस एक बॉलिंग मशीन आहे आणि बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला जात आहे. जोपर्यंत आपण बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडत नाही तो पर्यंत आपण वाचू आणि आपण आपली विकेट वाचवण्यात यशस्वी ठरु. सोबतच आपण आपल्या देशासाठी ही टेस्ट मॅच देखील वाचवू. घरातच आहे. लॉकडाऊन.'



कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवला आहे. याआधी देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा लॉक़डाऊन वाढवण्यात आला आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास १० हजार लोकांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे.


अधिक वाचा : धोक्याची घंटा, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेला प्रत्येक दुसरा व्यक्ती महाराष्ट्राचा