Kedar Jadhav: क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता; पोलीस अॅक्शन मोडवर!
Kedar Jadhav Pune News: केदार जाधव याचे वडील (Kedar Jadhav`s father) महादेव जाधव हे पुण्यातून (Pune News) बेपत्ता झाल्याने जाधव परिवारावर संकट कोसळलंय. महादेव जाधव (Mahadev Jadhav) यांनी आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले होते.
Kedar Jadhav's father missing: टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधवचे (Kedar Jadhav) वडील पुण्यातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केदार जाधव याचे वडील (Kedar Jadhav's father) महादेव जाधव हे पुण्यातून (Pune News) बेपत्ता झाल्याने जाधव परिवारावर संकट कोसळलंय. पुण्यातील कोथरूड (kothrood) भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचा परिवार कोथरूड भागात राहायला आहे. महादेव जाधव (Mahadev Jadhav) यांनी आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत आहे. त्यानंतर परिवाराने पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केली.
आणखी वाचा - Virat Kohli: "दारू पिल्यानंतर मी...", अनुष्कासमोर विराटने सांगितला 'तो' किस्सा!
पुण्यात जन्म झालेल्या केदारचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जाधववाडी आहे. 26 मार्च 1985 रोजी त्याचा पुण्यात जन्म झाला होता. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळमध्ये लिपिक राहिलेल्या महादेव जाधव यांनी 1980 साली सोलापूर सोडलं आणि पुण्यात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी 2003 मध्ये निवृत्ती घेतली.
IPL 2023 मध्ये Kedar Jadhav राहिला 'अनसोल्ड'
एक काळ असा होता, ज्यावेळी केदार जाधव टीम इंडियासाठी बॅकबोन असायचा. धोनीनंतर मैदानात येऊन ऐनवेळी सामना पलटवण्याची ताकद केदारमध्ये होते. काही दिवसात तो धोनीचा खास ठरला आणि सीएसकेमध्ये जागा मिळवली. मात्र, त्यानंतर त्याला आयपीएल लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतलं नाही.तर 2023 च्या आयपीएल लिलावातही (IPL Mini Auction) त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे केदारच्या फॅन्सने नाराजी व्यक्त केली होती.