Prithvi Shaw New House: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये पृथ्वी शॉ यंदा दमदार कामगिरी करत आहे.  दिल्ली कॅपिटन्सकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने  आयपीएल मध्यावर असताना आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. पृथ्वी शॉने आपलं हक्काचं घर विकत घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या अवघ्या 22 वर्षी पृथ्वीने मुंबईच्या बांद्रे भागात घरं खरेदी केलं असून याची किंमत तब्बल साडेदहा कोटी रुपये इतकी आहे.  2209 स्क्वेअर फूट एरिया असलेलं हे घर वांद्रे इथल्या एका पॉश सोसायटीच्या आठव्या मजल्यावर आहे.


पृथ्वी शॉला या घरासोबत तीन कार पार्क करण्यासाठी जागाही मिळाली आहे.  31 मार्च रोजी पृथ्वी शॉने 52.50 लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क भरलं होतं, त्यानंतर 28 एप्रिल रोजी हे घर पृथ्वी शॉच्या नावावर झाले.


पृथ्वी शॉची कमाई
पृथ्वी शॉ सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो आणि प्रत्येक हंगामात संघाकडून त्याला 7.50 कोटी रुपये मिळतात. 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषकही जिंकला होता, भारतीय कसोटी क्रिकेटमध्येही पृथ्वी शॉने प्रतिनिधित्व केलं आहे. 


आयपीएल 2022 मध्ये कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉने आतापर्यंत 9 सामन्यात 259 धावा केल्या आहेत. यात त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियातून बाहेर आहे, त्याच्या फिटनेसबाबत मध्यंतरी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.


भारतीय संघातील कामगिरी
पृथ्वी शॉने 2018 मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारतासाठी तो आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 339 धावा केल्या आहेत. तर 6 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 189 धावा जमा आहेत. आयपीएलमध्ये पृथ्वी शॉने 62 सामन्यात 1564  धावा केल्या आहेत.