मोहाली : रोहित शर्माला २३ जानेवारी २०१३मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रायोगिक तत्वावर सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी कोणाच्याही असे ध्यानीमनी नव्हते की मुंबईचा हा सलामीवीर पुढे जाऊन क्रिकेटमधील इतके रेकॉर्ड तोडेल. 


सलामीवीर होण्याआधी खेळला होता ८६ सामने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलामीवीर म्हणून भूमिका बजावण्याआधी रोहितने ८६ सामन्यांत ३०.४३च्या सरासरीने केवळ १९७८ धावा केल्या होत्या. मात्र जसा तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरला त्यानंतर रोहितच्या बॅटमधून धावांची टांकसाळच उघडली. त्याच्या नावावर तर आता वनडेत तिसऱ्यांदा दुहेरी शतक ठोकण्याचा पराक्रम नोंदवला गेलाय.


८९ सामन्यांत ४४५० धावा


रोहित शर्माने सलामीवीर म्हणून ८९ सामन्यांमध्ये ५६.३२ च्या सरासरीने ४४५० धावा केल्यात. यात १४ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीवीर होण्याआधी रोहितच्या नावावर ८६ सामन्यांत केवळ दोन शतके आणि १२ अर्धशतके होती. त्याचा सर्वाधिक स्कोर ११४ इतका होता. 


सलामीवीर म्हणून भूमिका बजावताना रोहितचा सर्वाधिक स्कोर २६४ इतका होता. २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही खेळी केली होती. रोहितने २३ जानेवारी २०१३नंतर ८६ सामन्यांत सलामीची भूमिका बजावली. यात त्याने ५७.४२ च्या सरासरीने ४४२१ धावा केल्या. या दरम्यान केवळ एकदाच अफगाणिस्तानविरुद्ध २०१४मध्ये ढाकामध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास उतरला होता. यात त्याने १८ धावा केल्या होत्या.