मुंबई : आजकाल सोशल मीडियावर सेलिब्रिटींपेक्षा स्टारकिड्सच अधिक भाव खाऊन जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैमुर अली खान, मिशा प्रमाणेच क्रिकेटर्सच्या मुलांचेही व्हिडिओ आणि फोटोही झपाट्याने शेअर होतात.  


ज्युनियर गब्बरचा क्युट व्हिडिओ 


लहान मुलं निरागस असतात. त्यांची निरागसता नकळत चेहर्‍यावर हास्य खुलवून जाते. असाच प्रकार रोहित शर्मा आणि त्याच्या पत्नीसोबत झाला आहे. 
कारण होता शिखर धवनचा चिमुकला. 


जुनियर गब्बर म्हणजेच शिखर धवनच्या मुलाचे बोबडे बोल रितिका शर्माने व्हिडिओमध्ये कैद केले आहेत.  रोहित आणि रितिका त्याला काही शब्द बोलायला सांगते. परंतू प्रत्यक्षामध्ये ते सारेच बोलताना त्यातील एखादे अक्षर ज्युनियर गब्बर वेगळंचं बोलतो.  


शाळेत न पाठवण्याचा सल्ला 



 


रितिकाने इंस्टाग्रामवर 'ज्युनियर गब्बर'चा व्हिडिओ शेअर करताना याला शाळेत पाठवू नकोस..  त्याचा 'सूज' 'सूज'च राहू दे असे कॅप्शन लिहले आहे. 


टेस्ट सीरिज गेली मात्र शेवटचा सामना खिशात 


भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. यामध्ये तीन टेस्ट मॅचच्या सामन्यांमध्ये पहिले दोन्ही सामने भारतीय संघ हरले मात्र शेवटची कसोटी जिंकल्याने भारतीय संघासोबत त्यांचे कुटुंबीयही आनंदामध्ये आहेत. 


येत्या 1 फेब्रुवारीपासून  दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये एकदिवसीय सामने रंगणार आहेत तर 18,21 आणि 24 फेब्रुवारीदरम्यान टी 20 सामने रंगणार आहेत.