मुंबई : क्रिकेट विश्वाला अलविदा केलं असलं तरीही मास्टर ब्लास्टर अशी ख्याती असणाऱ्या क्रिकेटपटू Sachin Tendulkar  सचिन तेंडुलकर याची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. एखादा क्रिकेटचा सामना असो किंवा कोणतं एखादं ठिकाण, सगळीकडेच सचिनची उपस्थितीच सारंकाही सांगून जाते. पण, हाच सचिन जेव्हा वाट चुकतो किंवा मुंबईच्या रस्त्यांवर हरवतो तेव्हा नेमकं काय होतं याचा विचार केला आहे का तुम्ही कधी? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द सचिननंच याचं उत्तर दिलं आहे. तेही अतिशय प्रत्ययकारीपणे. सोशल मीडियावर जानेवारी महिन्यातील एक व्हिडिओ शेअर करत एका प्रसंगाची आठवणच त्यानं जागवली आहे. शिवाय मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या रिक्षा चालक मंगेश फडतरे यांचे आभारही मानले आहेत. 


सचिन तेंडुलकर अनेकांसाठी जणू एक स्वप्नच. हे स्वप्न प्रत्यक्षात जेव्हा समोरच उभं ठाकतं, तेही मदतीसाठी तेव्हा नेमकं काय होतं याचीच प्रतिची या व्हिडिओतील रिक्षा चालकाला पाहताना येत आहे. 


सचिन भेटला म्हणून अतिशय आपलेपणानं त्याच्याशी काही क्षणांचा संवाद साधत त्याला हक्कानं मदतीचा हात पुढं करणाऱ्या या रिक्षा चालकांचं खुद्द सचिनलाही भारीच कौतुक. 



काळ कितीही पुढं गेला तरीही, अशा प्रकारची मदतच अनेकदा सर्वोत्तम ठरते काहीशी अशीच भावना सचिननं हा व्हिडिओ पोस्ट करताना व्यक्त केली आहे. काय मग, चुकलेली वाट शोधण्यासाठी तुम्ही गुगल मॅपचा आधार घेता, की सचिनप्रमाणंच अशा कोणातरी व्यक्तीची मदत घेता?