मुंबई : क्रिकेच आणि चित्रपट विश्वाचं नातं तसं फार खास. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. म्हणजे मग ते प्रेमाचं नातं असो किंवा व्यवहाराचं, ही दोन विश्व एका अदृश्य धाग्याने एकमेकांशी जोडली गेली आहेत. हे नातं दिवसागणिक अधिकच दृढ होत आहे. या अनोख्या नात्यामध्येच आता प्रकाशझोतात आलेलं नाव म्हणजे भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर असणाऱ्या सुरेश रैना याने त्याच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. येत्या काळात तो आयपीएलच्या सामन्यांमधून मैदानात दिसणार आहे. ज्यासाठीची तयारीही त्याने सुरु केली आहे. असा हा रैना एकेकाळी चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीवर फिदा होता. 


इव्हेस्टमेंट बँकर प्रियांका चौधरी हिच्याशी लग्नगाठ बांधलेल्या रैनानंच याविषयीचा खुलासा केला आहे. वैवाहिक जीवनात अतिशय सुखावह आयुष्य़ जगणाऱ्या रैनाचं एकेकाळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यावर क्रश होतं. महाविद्यालयीन दिवसांमध्ये ती त्याला प्रचंड आवडत होती. किंबहुना सोनालीला डेट करण्याची इच्छाही तो मनी बाळगून होता. एका कार्यक्रमात त्याने हा खुलासा केला. ज्या कार्यक्रमामध्ये त्याला सोनालीचा एक मेसेजही ऐकवण्यात आला. 



वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'



सोनालीचा मेसेज ऐकताच रैनाला फार आनंद झाला. सोनालीप्रती असणारी आपली आवड सांगणाऱ्या सुरेश रैना याने ती कॅन्सरशी झुंज देत होती तेव्हाही एक मेसेज पाठवला होता. आपल्या आवडत्या अभिनेत्रीप्रती रैनाने व्यक्त केलेलं हे आदरयुक्त प्रेम पाहता, यावर आता सौनाली काय प्रतिक्रिया देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.