शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

आजच्या घडीला ती चित्रपट विश्वात फारशी सक्रिय नसली तरीही.... 

Updated: Feb 15, 2020, 02:59 PM IST
शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'
संग्रहित छायाचित्र

मुंबई : काही चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फारशी तगडी कमाई करु शकले नाहीत, तरीही त्या चित्रपटांना समीक्षकांची मात्र चांगली पसंती मिळालेली असते. शिवाय एक असाही वर्ग असतो, ज्यांमध्ये हे चित्रपट विशेष गाजतात. बॉलिवूडपटांमधील असंच एक नाव म्हणजे 'स्वदेस'. 

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेता शाहरुख खान एका सुरेख आणि देशाभिमान जागवणाऱ्या एका प्रभावी कथानकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्यासोबत या चित्रपटातून एका अभिनेत्रीनेही स्क्रीन शेअर केली होती. ज्या अभिनेत्रीचा चित्रपटातील साधाभोळा लूक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. अभिनेत्री म्हणजे गायत्री जोशी. गायत्रीने साकारलेली 'गीता' आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. अशी ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून मात्र काही सोशल मीडिया पोस्ट वगळता इतर कुठेही फारशी झळकली नाही. 

१९९९मध्ये गायत्रीने 'फेमिना मिस इंडिया' या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने देशाचं प्रतिनिधीत्वं केलं होतं. काही मोठ्या जाहिरातींसोबतच ती म्युझिक अल्बममध्येही झळकली होती. गोदरेज, फिलीप्स, सनसिल्क या तिच्या विशेष गाजलेल्या जाहिराती. 

एकाच चित्रपटात झळकलेल्या गायत्रीच्या चाहत्यांचा वर्ग तयार होत असतानाच लग्नबंधनात अडकल्यानंतर तिने कलाविश्वातून काढता पाय घेतला. २००५मध्ये तिने व्यावसायिक विकास ओबेरॉय याच्याशी लग्नगाठ बांधली होती. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

गायत्रीचा पती हा ओबेरॉय रिऍलिटीच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पदी आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात त्याच्या नावाला बरंच वजन आहे.  गायत्रीही तिच्या पतीला या व्यवसायामध्ये हातभार लावत असल्याचं म्हटलं जातं. एका अभिनेत्रीसोबतच 'बिझनेस वुमन' म्हणूनही तिची वेगळी ओळख आहे.