Umesh Yadav : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) च्या घरी महिला दिनीच एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. उमेश यादव आणि त्याची पत्नी तान्या यांना कन्यारत्न झालं आहे. उमेशने नुकतंच सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. या चिमुकलीच्या आगमनाने उमेश दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वेगवान गोलंदाज  उमेश यादव (Umesh Yadav) सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) हिस्सा आहे. दरम्यान या सिरीजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. मात्र या सामन्यामध्ये उमेश यादवने चांगला खेळ केला होता. या सिरीजचा शेवटचा सामना 9 मार्च रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. अशातच उमेश यादवसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 


महिला दिनी बाबा बनला Umesh Yadav


8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी उमेश यादवच्या घरी एका मुलीचं आगमन झालं आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) ची त्याची पत्नी तान्या (Tanya) हिने मुलीला जन्म दिला आहे.  



उमेश यादवने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची माहिती दिलीये. उमेशने त्याच्या पोस्टमध्ये ‘Blessed with baby girl’ असं लिहिलं आहे. त्याच्या या ट्विटनंतर सर्वजण त्याला शुभेच्छा देत आहेत.


2013 मध्ये लग्नबंधनात अडकला होता उमेश


उमेश यादव आणि त्याची पत्नी तान्या यांची 2010 मध्ये एका पार्टीदरम्यान भेट झाली होती. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली असून याचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर 2013 मध्ये उमेश आणि तान्या दोघंही लग्नबंधनात अडकले. तान्या नवी दिल्लीमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करते. 2021 मध्ये तान्या आणि उमेशला एक मुलगी झाली. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालंय. 


उमेश यादवच्या वडिलांचं निधन


उमेश यादवच्या (Umesh yadav) वडिलांचे निधन झाले. तिलक यादव यांनी बुधवार 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून उमेशचे वडील आजारी होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी तिलक यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना मिलन चौक खापरखेडा येथील त्यांच्या घरी आणण्यात आले.