मुंबई : क्रीडा विश्वातून सर्वात मोठी बातमी आहे. माजी क्रिकेटर विनोद कांबळीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. मुंबईतील वांद्रा परिसरात विनोद कांबळीने नशेत गाडी चालवली होती. नशेत गाडी चालवणं हा गुन्हा तर आहेच पण त्यासोबत त्यांनी धडकही मारली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद कांबळी दारू पिऊन गाडी चालवत होता. एका व्यक्तीनं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. विनोद कांबळी यांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तक्रारदाराच्या गाडीला धडक मारली होती. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी दखल घेऊन विनोद कांबळीला अटक केली. 


विनोद कांबळीला जामीन मंजूर झाला आहे. याआधी तो सायबर क्राईममध्ये देखील अडकला होता. KYC अपडेट करायला सांगून एकाने त्याला ठगवलं होतं. मात्र सायबर पोलिसांनी याचा छडा लावून रक्कम विनोदला परत केली होती.


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विनोद कांबळी यांनी सोसायटी गेटला गाडी ठोकली होती. भारतासाठी विनोदने 107 वन डे सामने खेळले आहेत. त्याने 107 वन डे सामन्यात 2477 धावा केल्या. 2 शतक आणि 14 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. 17 कसोटी सामन्यात त्याने 1084 धावा करत 4 शतक ठोकले होते.