मुंबई : हॅमिल्टनमध्ये झालेल्या तिसऱ्या T20 टी२० सामन्यात Indian cricket team भारतीय क्रिकेट संघाने New Zealand न्यूझीलंडच्या संघाला अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत विजयाच्या आशेवर ठेवलं. अखेर भारतीय फलंदाजांच्या आत्मविश्वासापुढे सुपरओव्हरमध्ये धडक मारुनही न्यूझीलंडच्या संघाला सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्धारित २० षटकांमध्ये दोन्ही संघांनी १७९ इतकी धावसंख्या केली. भारतीय संघाकडून गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीने प्रभावी खेळाचं प्रदर्शन केलं. तर, फलंदाजांनीही समाधानकारक काम केलं. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मात्र काही प्रसंगी क्रिडारसिकांची निराशा झाली. दोन्ही संघांच्या खेळीनंतर हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. न्यूझीलंडकडून या निर्णायक षटकात १८ धावांचं आव्हान भारतीय संघापुढे ठेवण्यात आलं. ज्यासाठी रोहित शर्मा आणि के.एल. राहुल मैदानात आले. टीम साऊथीच्या गोलंदाजीपुढे या फलंदाजांनी अखेर सामना खिशात टाकला आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. अतिशय रोमहर्षक अशा या सामन्यातील विजयानंतर क्रीडा क्षेत्रापासून सर्वत्रच भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. 


जल्लोष आणि आनंदाच्या याच वातावरणात Virender Sehwag वीरेंद्र सेहवाग या भारतीय संघातील माजी खेळाडूने त्याच्या अनोख्या आणि तितक्याच हटके अंदाजात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांची प्रशंसा करत एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये दोन्ही खेळाडूंचे फोटो पोस्ट करत, सेहवागने दिलेलं कॅप्शन हे खऱ्या अर्थाने सर्वांची मनं जिंकून गेलं. 



वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ


'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है.... अशक्य गोष्टीही शक्य करणाऱ्या रोहित शर्मासाठी हे शब्द पूर्णपणे लागू आहेत', असं लिहित त्याने एकिकडे रोहितचं कौतुक केलं. तर, विरोधी संघाकडून विजय हिसकावून आणणाऱ्या शमीचीही त्याने प्रशंसा केली. हा विजय कायमच संस्मरणीय असेल, अशा शब्दांत सेहवाग व्यक्त झाला. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंची खेळी क्रीडारसिकांची मनं जिंकून गेली, तर मैदानाबाहेर सेहवागचा हा शाब्दिक षटकार सर्वांचीच दाद मिळवून गेला.