Dhanashree Verma: टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहलची (yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्मा  (Dhanashree Verma) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. धनश्री सतत तिचे डान्स व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) पोस्ट करत असते जे व्हायरल होतात. धनश्री ही एक यूट्यूबर आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ही  जोडी एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आली ती म्हणजे त्या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता धनश्री वर्माबाबत आणखी एक बातमी समोर आली आहे. रील शूट करत असताना धनश्री वर्माच्या पायाला दुखापत झाली. ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धनश्रीच्या लिगामेंटला दुखापत झाली होती. धनश्रीने पोस्ट शेअर करून तिच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे.


धनश्री वर्माने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, एक यशस्वी शस्त्रक्रिया, प्रत्येक अडचण तुम्हाला नवीन आणि जोरदार पुनरागमनासाठी तयार करते. मला पूर्वीपेक्षा तंदुरुस्त वाटत आहे. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.



यजुवेंद्र चहलची प्रतिक्रिया
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आणि धनश्री वर्माचा पती यजुवेंद्र चहलने तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. यजुवेंद्र चहलने आपल्या कमेंटमध्ये म्हटलंय, 'गेट वेल सून वाइफी'.


यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचं 22 डिसेंबर 2020 मध्ये लग्न झालं. धनश्री वर्मा डान्स कोरिओग्राफर आणि डेंस्टिटही आहे. काही दिवसांपूर्वी धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चहल आडनाव हटवलं. धनश्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आधी धनश्री वर्मा-चहल असं लिहिलेलं होतं.  त्यामुळे त्यांच्या नात्यात दुराव आला आहे का अशी चर्चा सुरु झाली होती.