आपल्या खेळामुळे चर्चेत आहेत या किक्रेटर्सची मुले...
वडीलांप्रमाणेच क्रिकेटमध्ये आपलं करिअर घडवू पाहणारे दिग्गज क्रिकेटर्सच्या मुलांची ओळख....
नवी दिल्ली : वडीलांप्रमाणेच क्रिकेटमध्ये आपलं करिअर घडवू पाहणारे दिग्गज क्रिकेटर्सच्या मुलांची ओळख....
वेस्टइंडीजचे दिग्गज शिवनारायण चंद्रपॉल आणि त्यांचा मुलगा तेज नारायण हे एकत्र क्रिकेट खेळतात. एक मॅचमध्ये तर त्यांनी ५०-५० रन्स एकत्र केले आहेत. शिव नारायण ४३ वर्षांचे असून तेज २१ वर्षांचा आहे. सध्या तो सुपर ५० टूर्नामेंटमध्ये खेळत आहे. तेज नारायण २०१४ मध्ये अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीजतर्फे खेळले होते.
सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर. १८ वर्षांचा अर्जुन लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आणि बॅट्समन देखील आहे. अलिकडेच त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एका सामन्यात २४ बॉलमध्ये ४८ रन्स केले आणि ४ विकेट्सही घेतल्या. मुंबईच्या अंडर १९ च्या टीमतर्फे तो सध्या खेळतो. गेल्या तो जेवाय इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये अंडर १९ वनडे टीममध्ये मुंबईतर्फे खेळतो. अर्जुन आपल्या वडीलांचे अपुर्ण स्वप्न पूर्ण करेल, अशी आशा आहे. कारण सचिनला फास्ट बॉलर व्हायचे होते.
मखाया एंटिनीचा मुलागा थांडो सध्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. साऊथ आफ्रीकेच्या अंडर १९ वर्ल्ड कप टीममध्ये सध्या तो खेळतो. त्याला फास्टर बॉलर व्हायचे होते. मात्र तो उत्तम बॅट्समन झाला. थांडोने ३ मॅचमध्ये ३ विकेट्स घेतले. तो पाचव्या स्थानावर बॅटिंग करतो. गेल्या वर्षी वेस्टइंडीज दौऱ्यात ४ मॅचमध्ये त्याने ७ विकेट्स घेतल्या.
अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान. पुढच्या वर्षी वर्ल्ड टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची त्याची इच्छा आहे. २४ वर्षांचा उस्मान न्यू साऊथ वेल्स प्रिमीयर ग्रेड A लीगमध्ये खेळत आहेत. ९ मॅचमध्ये त्याने ३० विकेट्स घेतल्या आहेत. तो पाकीस्तानच्या अंडर १५ आणि १९ टीममध्ये खेळला आहे.
राहुल द्रविडचा मुलगा समित. समित वडीलांप्रमाणेच बॅट्समन आहे. अलिकडेच त्याने अंडर १४ शाळेच्या क्रिकेटमध्ये १५० रन्स केले. २०१६ मध्ये अंडर १४ मध्ये १२५ धावांची कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले. २०१५ मध्ये शाळेच्या अंडर १२ टीमच्या तर्फे गोपालन क्रिकेट चॅलेंज कपमध्ये ९३ धावा करत विजय मिळवला.
स्टीव वॉचा मुलगा ऑस्टीन. ऑस्टीन वॉ अंडर १९ वर्ल्ड कप २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळला आहे. गेल्या वर्षी नॅशनल चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये नाबाद १२२ धावा केल्या. ऑस्टीन वडीलांप्रमाणेच मिडल ऑर्डर बॅटिंग करतो.