मुंबई : क्रिकेटर्स आणि त्यांच्या गर्लफ्रेंड आणि पत्नी नेहमी चर्चेत असतात. आयपीएलच्या मैदानापासून त्यांच्या पर्सनल लाईफपर्यंत वेगवेगळ्या बातम्या आपल्या कानावर येत असतात. प्रेक्षकांमधून आपल्या पतीला चिअर करताना त्या नेहमी दिसतात. पण काही क्रिकेटर्सच्या पत्नी केवळ चिअर्सच करत नाहीत तर व्यावसायिक क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख बनवून आहेत. 

हेजल किच :


आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबमधून खेळणाऱ्या युवराज सिंहच्या फॅशनन क्लोदिंग लाईन वायडबल्यूसीचा कारोभार त्याची पत्नी हेजल संभाळते.  ही क्लोदींग लाइन डिझायनर शांतनु, निखिल आणि सुदिती इंडस्ट्रिज यांनी एकत्र येऊन लॉंच केली होती. 


जेसिका जॉनसन : 


जेसिका जॉनसन ही एक्सेसरी स्टोरची मालकीण आहे. कोलकाता नाइट रायडरचा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिशेल जॉनसनची पत्नी जेसिका आपल्या पतीला चियर करताना स्टेडियममध्ये नेहमी दिसते. २००६ मध्ये ती कराटे वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ जिंकली. 'जेसिका बेट्रिच' नावाचा तिचा व्यवसाय असून एक्सेसरी बनविल्या जातात. त्यांना रुबीका नावाची मुलगी आहे. 

ली फरलॉन्ग वॉटसन : 


ली फरलॉन्ग वॉटसन ही 'एस एफ सेलेब्रिटी मैनेजमेंट कंपनी'ची मालकिण आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू शेन वॉटसनची पत्नी ली वॉटसन फॉक्स स्पोर्ट्सची प्रेझेंटर आहे. ऑस्ट्रेलियन सेलिब्रेटींचे करियर आणि प्रोफाइल मॅनेज करते. 

दिपिका पल्लीकल कार्तिक : 


आयपीएल कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन दिनेश कार्तिकची पत्नी स्कॉश प्लेयर आहे. जागतिक स्कॉश टॉप १० मध्ये जागा बनवणारी पहिली भारतीय आहे. ग्लॅमरस लूकमूळे तिला ग्लोबस लिमिटेड कॉन्ट्रॅक्ट मिळाल. आता ती हर्बल लाइफची ब्रांड अॅम्बेसिटर आहे. यामध्ये तिची भागीदारीही आहे. 

साक्षी धोनी : 


आम्रपाली माही डेव्हलपर्स प्रायवेट लिमिटेडची संचालक. भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचा कप्तान महेंद्रसिंग धोनीसोबत ती व्यावसाय संभाळते. तिचे आम्रपाली माही डेव्हरपर्स प्रा.लि. मध्ये २५ टक्के होल्डिंग आहे. आताही तिच्याकडे कंपनीचे होल्डिंग आहे का याबाबत ठोस माहिती नाही.

अनुष्का शर्मा : 


टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा क्लीन स्लेट फिल्म्स प्रोडक्शनची मालकिण आहे. २०१४ मध्ये तिने हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं.