Cristiano Ronaldo Geta Angry: फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत रोनाल्डो संतापलेला दिसत असून चाहत्यावर ओरडतो आहे. सोशल मीडियावर (Social Media) रोनाल्डोच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या संतापण्यामागे लिओनेल मेस्सीचाही (Lionel Messi) संबंध आहे. Al-Nassr संघाने 3-1 ने Al-Batin चा पराभव केल्यानंतरही रोनाल्डो संतापलेला होता. मैदानातून ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना एका चाहत्याने रोनाल्डोची तुलना मेस्सीशी केली. यामुळे पोर्तुगीजचा हा स्टार खेळाडू संतापला आणि त्याला सुनावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत रोनाल्डो ड्रेसिंग रुममध्ये जात असताना चाहता 'मेस्सी चांगला खेळाडू आहे' असं चाहता म्हणताना दिसत आहे. रोनाल्डो ही कमेंट ऐकून संतापल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 'हो आणि हा फार सोपा गेम होता', असं सांगत रोनाल्डो आपला संताप व्यक्त करतो. 


Al-Nassr ने 3-1 ने हा सामना जिंकला असला, तरी रोनाल्डो मात्र या पराभवामुळे चांगलाच नाराज झाला होता. याचं कारण म्हणजे रोनाल्डोकडे मैदानात अनेक संधी आल्या होत्या. पण तो त्या गोलमध्ये रुपांतरित करु शकला नाही.



रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमधून बाहेर पडून अल-नासरशी जोडल्यापासूनची आकडेवारी पाहिल्यास, त्याने सौदी प्रो लीगमधील सहा सामन्यांमध्ये आठ गोल केले आहेत. 


19 सामन्यात 46 गुण जमा करून अल-नासर सध्या 16 संघांच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यंत 14 जिंकले आहेत. यामधील 4 अनिर्णित राहिले असून 1 सामना गमावला आहे. गुणतालिकेत अल-नासच्या पाठोपाठ अल-इतिहाद आहे. त्यांचे दोन गुण कमी आहेत.