Cristiano Ronaldo ने लपूनछपून उरकलं लग्न? Youtube चॅनेल सुरू करताच केला धक्कादायक खुलासा
Cristiano Ronaldo youtube channel : जगातील स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यानं यूट्यूबवर पदार्पण करताच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मात्र, रोनाल्डोच्या एका वक्तव्याची चर्चा होताना दिसतीये.
Cristiano Ronaldo married Georgina Rodriguez : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो याने बुधवारी युट्यूब चॅनेल सुरू केलं. रोनाल्डोवर युट्यूब चॅनेल उघडण्याची बंदी होती. मात्र, जेव्हा युट्यूबने बंदी उठवली तेव्हा रोनाल्डोच्या चॅनेलने कहर केला. केवळ 90 मिनिटात 10 लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठल्याने आता युट्यूब कंपनीला मोठा फायदा होणार की तोटा? असा सवाल विचारला जात आहे. युट्यूबच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो, यासाठी त्याच्या चॅनेलवर बंदी लावण्यात आली होती. अशातच आता रोनाल्डोचं अधिकृत युट्यूब चॅनेल सुरू झालंय. चॅनेल सुरू झाल्यावर रोनाल्डोने धक्कादायक खुलासा केलाय.
क्रिस्टियानो रोनाल्डो याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये दोघंही मजा करताना दिसतायेत. अशातच एका व्हिडीओमध्ये रोनाल्डोने जॉर्जिनाचा उल्लेख माझी पत्नी असं म्हणत केला. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. व्हिडीओमध्ये दोघांच्या हातात रिंग दिसत आहेत. त्यामुळे रोनाल्डोने लपूनछपून लग्न केलं की काय? असा सवाल विचारला जातोय.
रोनाल्डो जॉर्जिनाचा "माझी पत्नी" असा उल्लेख करण्यापूर्वी घरी प्रशिक्षण घेत होता, असं रोनाल्डोने सांगितलं. मला माझ्या पत्नीसोबत घरी प्रशिक्षण घेणे आवडते. कारण मी तिला प्रेरित करू शकतो आणि ती देखील मला प्रेरित करू शकते, असंही रोनाल्डोने यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, रोनाल्डोचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 रोजी मडेरा येथे झाला. ख्रिस्तियानो रोनाल्डोला लग्नाशिवाय पाच मुले आहेत. सध्या रोनाल्डो स्पॅनिश सुपरमॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोन्ही जोडपे 2017 पासून एकमेकांसोबत आहेत. पण याआधीही क्रिस्टियानो रोनाल्डोच्या अनेक गर्लफ्रेंड होत्या. ख्रिस्तियानो 5 वर्षांपासून एका टीव्ही प्रेजेंटरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 2005 मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव पोर्तुगीज मॉडेल आणि टीव्ही प्रेझेंटर मार्चेना रोमेरोसोबत जोडले गेले होते. त्यानंतर अनेक तरुणींची नावं समोर आली होती. 13 वर्षात 18 गर्लफ्रेण्ड, 5 मुले तरीही सिंगल.. अशी देखील ख्रिस्तियानोची ओळख करुन दिली जाते.