Cristiano Ronaldo : स्टार फुटबॉलपटू (Football) क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सध्या चांगलाच चर्चेत आहे. मॅनचेस्टर युनायटेडसोबत (Manchester United F.C.) सुरु असलेल्या शाब्दिक युद्ध सध्या सोशल मीडियावरही (Social Media) चांगलच गाजतंय. याच दरम्यान रोनाल्डोने त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये काही असं बोलून गेलाय, ज्यामुळे चाहत्यांना त्याचा इमोशनल अवतार पहायला मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिस्टियानो रोनाल्डोने सांगितलं ती,  तो त्याच्या मुलाच्या अस्थी नेहमी आपल्या सोबत घरामध्ये ठेवतो. रोनाल्डोच्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या मुलाला गमावणं ही त्याच्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण आणि घटना होती. याचं दुःख कधीही संपू शकणार नसल्याचं फुटबॉलपटूचं म्हणणं आहे. 


ऑक्टोबर 2021 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने जाहीर केलं होतं कीस त्याची पार्टनर जॉर्जिना रोड्रिगेजला जुळी बाळं होणार आहेत. त्यानंतर याचवर्षी एप्रिलमध्ये जॉर्जियाने मुलीला जन्म दिला, मात्र त्यामध्ये दुसऱ्या नवजात बाळाचं मात्र दुर्देवी निधन झालं. 


अस्थी कधीही समुद्रात टाकणार नाही


रोनाल्डोने इंटरव्ह्यूमध्ये पुढे सांगितलं की, बाळाच्या अस्थी माझ्यासोबत घरीत आहेत, जसं की माझ्या वडिलांच्या अस्थी आहेत. मी कधीही त्या अस्थी समुद्रात टाकणार नाही. माझ्या घरीच एक छोटं चर्च आहे, ज्याठिकाणी माझे वडील आणि माझा मुलगा सोबत आहे. तो काळंही माझ्यासाठी फार कठीण होता, कारण एका ठिकाणी बाळाच्या मृत्यूचं दुःख होतं, तर दुसरीकडे मुलीच्या येण्याचा आनंद.


रोनाल्डोच्या म्हणण्यानुसार, मी अनेकदा माझ्या कुटुंबाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे की, हे खूप कठीण आहे जिथे आपल्याला दुःख आणि सुख अनुभवायचं आहे. आपल्याला माहिती नसेल की, आपण हसणार की रडणार. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर हा जीवनातील सर्वात वाईट अनुभव होता. 


क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या फुटबॉल वर्ल्ड कप 2022 च्या तयारीमध्ये आहे. पोर्तुगल वर्ल्डकपच्या एच ग्रुपमध्ये आहे. या टीमसोबत घना, उरुग्वे आणि दक्षिण कोरिया देखील आहेत. दरम्यान नुकतंच रोनाल्डोने त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मॅनचेस्टर युनायटेडवर काही आरोप लावले, ज्यानंतर हा वाद सुरु झाला.