मुंबई : फिफा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत क्रोएशिया टीम पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचली. यूरोपमधील या देशाने जबरदस्त कामगिरी करत यंदा फुटबॉल प्रेमींना सुखद धक्का दिला आहे. फॅन्समध्य़े सध्या आनंदाचं वातावरण आहे. क्रोएशियाची टीम सध्या चर्चेत आहे. पण देशाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंडा ग्रेबर कितारोविक देखील तितक्याच चर्चेत आहे. सेमीफायनलमध्ये आपल्या देशाच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी त्या रशियाला मैदानात पोहोचल्या होत्या. त्यांनी बिझनेस क्लास ऐवजी इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करत रशियाला पोहोचल्या. सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड आणि क्रोएशियामध्ये झालेला सेमीफायनलचा सामना त्यांनी रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्यासोबत पाहिला. क्रोएशियाने विजय मिळवला आणि कोलिंडा यांनी जागेवर उड्या मारत आपल्या खेळाडूंना चीअर केलं. यानंतर कोलिंडा यांनी आपल्य़ा संघाच्या खेळाडूंचं आणखी उत्साह वाढवला. ड्रेसिंग रूममध्ये जात त्यांनी त्यांचं कौतूक केलं आणि त्यांची गळाभेट घेतली. सध्या हा व्हिडिओ जगभरात व्हायरल होत आहे.



कौण आहेत कोलिंडा


50 वर्षीय कोलिंडा क्रोएशियाच्या चौथ्या राष्ट्राध्यक्षा आहेत. जानेवारी 2015 मध्ये त्या क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या. क्रोएशिया आणि पूर्व यूरोपच्या त्या पहिला महिला आहेत ज्य़ा इतक्या मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत. नाटोमध्ये त्यांनी असिस्टेंट सेक्रेटरी जनरलचं पद देखील सांभाळलं आहे. देशातील अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत.



कोलिंडा यांना क्रोएशियन शिवाय इंग्लिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेचं देखील ज्ञान आहे. याशिवाय त्या फ्रेंच, जर्मन आणि इटली भाषा देखील बोलतात.