CSK CEO on MS Dhoni in IPL 2025 :  भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने 4 वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र असे असले तरी धोनीची फॅन फॉलोईंग अद्याप कमी झालेली नाही. एम एस धोनी वर्षातून एकदाच त्याच्या फॅन्सना आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. मागील काही वर्षांपासून धोनी आयपीएलमधून सुद्धा निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगल्या, मात्र धोनीने प्रत्येक आयपीएल सीजनमध्ये कमबॅक केलं. आयपीएल फ्रेंचायझींना 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही यावर CSK च्या सीईओंनी मोठे अपडेट्स दिले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार चेन्नई सुपरकिंग्स माजी कर्णधार एम एस धोनी याला आयपीएल 2025 साठी अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करू शकते. जर असे झाले तर  सीएसके धोनीला 4 कोटींमध्ये रिटेन करू शकते. ज्या खेळाडूने मागील 5 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत तसेच ज्यांच्याकडे बीसीसीआयचे  सेंट्रल कॉन्ट्रेक्ट नाही असे खेळाडू अनकॅप खेळाडू म्हणून निवडले जाऊ शकतात. 31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. दरम्यान सीएसके के सीईओ काशी विश्वनाथनने तामिळ न्यूज वेबसाइट स्पोर्ट्स विकातनशी बोलताना धोनीच्या उपलब्धतेवर मोठी माहिती दिली. 


हेही वाचा : खार जिमखानाकडून प्रसिद्ध क्रिकेटरचं सदस्यत्व रद्द, वडिलांवर धर्मपरिवर्तनाचे आरोप!


 


धोनीबाबत CSK चे सीईओ काय म्हणाले? 


सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथनने स्पष्ट केले की चेन्नई सुपरकिंग्स फ्रेंचायझीने एमएस धोनीला टीममध्ये सामील करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की आम्हाला हवंय की धोनीने सीएसकेमधून खेळावं. पण धोनीने आम्हाला याबाबत अदयाप होकार दिलेला नाही. धोनीचं म्हणणं आहे की 31 ऑक्टोबरव्यापूर्वी तो आम्हाला कळवेल. जर धोनी होकार देतो तर त्याला 4 कोटी रूपयांना रिटेन केले जाऊ शकते कारण त्याने 2019  नंतर एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळे धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात सामील होईल. 


एम एस धोनीचा नवा लूक :


मागील काही वर्षात आयपीएलमध्ये धोनी नव्या लूकमध्ये दिसत असतो. गेल्यावर्षी धोनीने  2007 सालचा त्याचा विंटेज लॉन्ग हेअर लूक केला होता. हा लूक त्याच्या चाहत्यांना फार आवडला. काहीच दिवसांपूर्वी धोनीने पुन्हा एकदा हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमकडून केसांची नवीन हेअर स्टाईल केली आहे. त्यामुळे फॅन्सना आशा आहे की एम एस धोनी आयपीएल 2025 मध्ये सुद्धा दिसेल.