Chennai Super Kings : आयपीएल 2024 चा लिलाव (IPL 2024 Auction) 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे. भारताबाहेर लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. सध्या आयपीएलच्या लिलावापूर्वी संघांमध्ये खेळाडूंची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया (IPL 2024 Trading Window) सुरू आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे इंडियन प्रीमियर लीगचा 2024 हंगाम खेळणार नाही. अशातच आता चेन्नईच्या संघात 8 खेळाडू यंदा दिसणार नाही. सुपर किंग्जकडे आता ३२.१ कोटी रुपयांचे बजेट शिल्लक आहे. 


CSK ने दिला या खेळाडूंना डच्चू (CSK released players)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेन स्टोक्स, ड्वेन प्रेटोरियस, अंबाती रायुडू, सीसनदा मागाला, काइल जेमिसन, भगत वर्मा, सेनापथी आणि आकाश सिंग. 


CSK ने या खेळाडूंना ठेवलं कायम (CSK retained players)


एमएस धोनी (C), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शाहिद मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना.



ड्वेन प्रिटोरियस 2022 मध्ये सुपर किंग्जमध्ये सामील झाला. त्याने सात सामने खेळले आहेत आणि 2023 मध्ये सुपर किंग्जच्या विजयी संघाचा भाग होता. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसनला सुपर किंग्जने IPL 2023 च्या खेळाडूंच्या लिलावात निवडलं होतं पण दुखापतीमुळे तो हंगामाला मुकला होता. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मगाला हा खेळाडू होता. 


आणखी वाचा - IPL 2024 : अनाकलनीय! RCB चा खळबळजनक निर्णय, 'या' तीन स्टार खेळाडूंना दिली सोडचिठ्ठी


दरम्यान, 22 नोव्हेंबर रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ट्रेड झाला. यामध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांचा फलंदाज देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी रुपये) आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा गोलंदाज आवेश खान (१० कोटी) यांची अदलाबदल केली. तर या आधी 3 नोव्हेंबर रोजी रोमारियो शेफर्ड लखनऊमधून मुंबई इंडियन्समध्ये गेला. तो यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.