CSK IPL 2022 Retained Players: धोनीच्या टीमने या 4 खेळाडूंना केलं रिटेन, हे 18 खेळाडू बाहेर
चेन्नई सुपर किंग्जने या 4 खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवले आहे.
मुंबई : चार वेळचा चॅम्पियन सुपर किंग्स संघाने आयपीएल 2022 पूर्वी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. CSK ने चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या नावांचा समावेश आहे, ज्यांनी गेल्या मोसमात संघाच्या विजेतेपदात मोलाची भूमिका बजावली होती. परदेशी खेळाडूंमध्ये अष्टपैलू मोईन अली (moeen ali) याची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सॅम करणचे नावही चर्चेत होते. पण चेन्नईच्या खेळपट्टीचा विचार करून मोईनची निवड करण्यात आली. तो एक चांगला हिटर तसेच फिरकी गोलंदाज आहे. (CSK IPL 2022 Retained Players)
चार खेळाडूंना कायम ठेवल्याने चेन्नई सुपर किंग्जच्या बजेटमधून 42 कोटी रुपये कापले जातील. सीएसकेने फाफ डू प्लेसिस आणि सुरेश रैना यांसारखे मोठे खेळाडू कायम ठेवलेले नाहीत.
सीएसकेने या खेळाडूंना कायम ठेवले
एमएस धोनी - यापुढेही चेन्नईचं कर्णधारपद सांभाळताना तो दिसू शकतो.
ऋतुराज गायकवाड - संघाचा युवा सलामीवीर. IPL 2021 चा हिरो ठरला होता.
रवींद्र जडेजा - CSK चा तो पुढचा कर्णधार होऊ शकतो. अलीकडच्या हंगामात तो गोलंदाजीसोबतच फिनिशरच्या भूमिकेत दिसला.
मोईन अली - एकमेव परदेशी खेळाडू आहे. आयपीएल 2021 पूर्वीपासून संघाशी संबंधित होता. अष्टपैलू क्षमतेमुळे त्याला संघात ठेवण्यात आले आहे.
या खेळाडूंना केले रिलीज
सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस, एन जगदीसन, अंबाती रायडू, सॅम कुरन, जोश हेझलवूड, लुंगी एनगिडी, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा, सी हरी निशांत, आर साई किशोर, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर, ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, डॉमिनिक ड्रेक्स, केएम आसिफ.