मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 14) काही दिवसातच सुरु होणार आहे. पण याआधी 3 वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने (Josh Hazelwood) यंदाच्या आयपीएलमधून बाहेर झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी आयपीएलमधून माघार घेण्यामागचं कारण सांगताना हेजलवुडने सांगितले की, यावर्षी होणाऱ्या अॅशेस आणि टी-20 वर्ल्डकपसाठी त्याला फीट राहायचं आहे. तसेच त्याला आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवायचा आहे. हेझलवूडने cricket.com.au ला सांगितले की, 'या कठीण काळात बायो बबल आणि क्वारंटाईनला 10 महिने झाले आहेत. त्यामुळे आता मी काही दिवस क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढील दोन महिने मी ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या घरी राहणार आहे.'


जोश हेजलवुडच्या अगोदर ऑस्ट्रेलियन स्टार मिशेल मार्श देखील बायो-बबलमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेत आहे. क्रिकबझच्या माहितीनुसार, मिशेल मार्शने यंदा आयपीएलमध्ये भाग न घेण्याचे कारण सांगितले की तो जास्त काळ बायोबबलमध्ये राहू शकत नाही.' 


कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे क्रिकेटर्ससाठी बायो-बबलची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये खेळाडूंना यातून बाहेर जाता येत नाही.


बायो बबल म्हणजे काय?


कोरोना व्हायरस साथीचा धोका लक्षात घेता, संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि सामन्यांच्या अधिकाऱ्यांसाठी एक विशेष क्षेत्र तयार केले जाते. त्याला 'बायो बबल' असे म्हणतात. या भागात कोणत्याही बाह्य व्यक्तीचा संपर्क येत नाही.